देशाला हुशार लोकांची गरज आहे, त्यामुळे अमेरिकेतील विद्यापीठांत शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना हाकलून लावता कामा नये, असे अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे इच्छुक उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. फॉक्स न्यूज या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केले. मुलाखतीत त्यांनी आपली स्थलांतरितांसंबंधी भूमिका स्पष्ट केली. ट्रम्प सरसकट सर्व स्थलांतरितांच्या विरोधात असावेत, असे मानण्यात येत होते. मात्र तसे नसल्याचे त्यांनी या वेळी सूचित केले. भारतातील अतिशय हुशार विद्यार्थी अमेरिकेतील हार्वर्डसारख्या दर्जेदार विद्यापीठांत शिक्षणासाठी येतात. पदवी घेऊन ते भारतात परतल्यानंतर उद्योगांची स्थापना करून अनेकांना रोजगार मिळवून देतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Donald trump favours indian students staying back in usc