US Presidential Election 2024 Result: गेल्या महिन्याभरापासून अवघ्या जगाचं लक्ष लागलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट होऊ लागले आहेत. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प या निवडणुकीत विजयी झाले असून ते दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत. दुसरीकडे डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार व विद्यमान उपाध्यक्षा कमला हॅरिस या पराभूत झाल्या आहेत. अजूनही पूर्ण जागांचे निकाल हाती आलेले नसले तरी समोर आलेल्या आकडेवारीनुसार डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले आहेत. याच आधारावर त्यांनी केलेल्या विजयी भाषणात अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?

वेस्ट बीच परिसरात केलेल्या विजयी सभेतील भाषणात डोनाल़्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील नागरिकांचे आभार मानले. “मी तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो. ही एक अभूतपूर्व अशी चळवळ आहे. माझा विश्वास आहे की ही आजपर्यंतची सगळ्यात मोठी राजकीय चळवळ आहे. आता ही पुढे आणखी वाढत जाणार आहे. कारण आपण आता आपल्या देशासमोरील समस्या दूर करण्यासाठी सगळे मिळून मदत करणार आहोत. आपण सगळ्या सुधारणा करणार आहोत. आपण आपल्या सीमाही सुधारणार आहोत. आपण आज इतिहास घडवला आहे. त्याचं कारण म्हणजे आपल्यासमोर अशा अडचणी आल्या की ज्या पार करता येतील असं कुणालाही वाटलं नव्हतं. पण अमेरिकेच्या लोकांनी हे घडवून आणलं. तुमचा ४५वा आणि ४७वा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून येणं माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे”, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

“अमेरिकेला पुन्हा महान बनवण्याची संधी”

“मी तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या भवितव्यासाठी प्रत्येक दिवशी लढत राहीन. जोपर्यंत माझ्या शरीरात श्वास आहे, तोपर्यंत मी लढत राहीन. समर्थ, सुरक्षित आणि वैभवशाली अमेरिका घडल्याशिवाय मी शांत बसणार नाही. हा अमेरिकेचा सुवर्णकाळ असणार आहे. अमेरिकन नागरिकांसाठी हा मोठा विजय असणार आहे. यामुळे अमेरिकेला पुन्हा महान बनवण्याची संधी आपल्याला मिळणार आहे”, असा दावाही ट्रम्प यांनी केला.

Donald Trump Won US Election 2024: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा डोनाल्ड ट्रम्प, कमला हॅरीस पराभूत!

“हा देश जगात सर्वात महान आहे. ते वैभव आपल्याला परत मिळवावं लागणार आहे. आपल्याला सीमा बंद कराव्या लागतील. आपल्याला लोकांनी अमेरिकेत परत यायला हवं आहे. पण त्यांना कायदेशीर मार्गाने यावं लागेल”, असं म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील बेकायदा स्थलांतराच्या समस्येला हात घातला.

यंदाच्या निवडणुकीत अमेरिकेत बेकायदेशीररीत्या होणार्‍या स्थलांतराचा मुद्दा ऐरणीवर आला होता. निवडणूकपूर्व सर्वेक्षणात तब्बल २८ टक्के अमेरिकन नागरिकांनी बेकायदा स्थलांतर ही अमेरिकेसाठी सर्वात मोठी समस्या असल्याचं मत व्यक्त केलं होतं. त्याचे पडसाद डोनाल्ड ट्रम्प व कमला हॅरिस यांच्या प्रचारावरही पडल्याचं दिसून आलं. आता विजयानंतरच्या पहिल्याच भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यावर भाष्य करून अमेरिकेतील जनतेला आश्वस्त केलं आहे.

US Election Results 2024 Live Updates: “माझ्या शरीरात शेवटचा श्वास असेपर्यंत…”, डोनाल्ड ट्रम्प यांचं विजयी भाषण!

“बलाढ्य लष्कर हवंय, पण कधीही वापरायचं नाहीये”

डोनाल्ड ट्रम्प पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाले तर ते जगात युद्ध घडवून आणतील, अशी टीका डेमोक्रॅटिक पक्षातील त्यांच्या विरोधकांनी केली होती. त्यावर ट्रम्प यांनी भाष्य केलं. “आपल्याला सुरक्षित सीमा हव्या आहेत. आपल्याला समर्थ लष्कर हवंय. पण आपल्याला ते कधीही वापरायची गरज पडणार नाही. आपण युद्ध केलेलं नाही. ते म्हणतात मी युद्ध सुरू करेन. पण मी युद्ध सुरू करणार नाही, मी युद्ध थांबवेन”, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.