पीटीआय, मिलवॉकी

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर अमेरिकन जनतेने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. आपण आपल्या संकल्पावर ठाम असून अमेरिकन जनतेची सेवा करणारे सरकार स्थापन करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगत ऐक्याचे आवाहन केले.

There is no bargaining power remain in eknath shinde and ajit pawar says congress leader vijay wadettiwar
“एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यात ‘बार्गेनिंग पॉवर’ नाही,” विजय वडेट्टीवार असे का म्हणाले? वाचा…
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
Rahul Narwekar
विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार का? अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केली भूमिका
A groom breaks down in tears as he watches his bride cry
नवरीला रडताना पाहून नवरदेवही रडला! VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “नशीबवान आहेस ताई तू…”
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!
Eknath Shinde
Eknath Shinde : “…पण ते पुन्हा आले”, देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी केलं राहुल नार्वेकरांचं अभिनंदन!

आगामी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाकडून अधिकृतपणे उमेदवारी स्वीकारल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी हे विधान केले आहे. रिपब्लिकन पक्षाने गुरुवारी मिलवॉकी येथे झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात ट्रम्प यांना तिसऱ्यांदा अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले. ट्रम्प म्हणाले, ‘‘आज रात्री, मी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नामांकन स्वीकारत आहे.’’ पेनसिल्व्हेनियामध्ये शनिवारी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला संबोधित करताना ते म्हणाले, ‘‘आजपासून चार महिन्यांनंतर आम्हाला दणदणीत विजय मिळेल आणि आम्ही आमच्या देशाच्या इतिहासातील चार सर्वोत्तम वर्षांची सुरुवात करू. आम्ही एकत्र मिळून सर्व जाती, धर्म, रंग आणि पंथाच्या लोकांसाठी सुरक्षा, समृद्धी आणि स्वातंत्र्याच्या नवीन युगाची सुरुवात करू.’’

हेही वाचा >>>फौजदारी कायदे बदलण्याची काय गरज होती?मद्रास उच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल

ट्रम्प म्हणाले, ‘‘आज मी नम्रपणे तुमचे सहकार्य, तुमचा पाठिंबा आणि तुमचे मत मागतो. तुमच्या विश्वासाचा आदर करण्यासाठी मी दररोज प्रयत्न करीन आणि मी तुम्हाला कधीही निराश करणार नाही. कोणतीही गोष्ट आपल्याला रोखू शकत नाही. आपल्या मार्गात कितीही मोठे संकट आले आणि कितीही अडथळे आले तरी आपण आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी झटत राहू आणि त्यात आपण कमी पडणार नाही.’’

Story img Loader