Donald Trump Speech Updates : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज (५ मार्च) संसदेच्या संयुक्त सत्राला संबोधित केलं. अमेरिकेच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर नव्या कार्यकाळात ट्रम्प यांनी पहिल्यांदाच संसदेला संबोधित केलं. ते आज टॅरिफ वॉर व युक्रेनबरोबरच्या खनिजांच्या सौद्याबाबत ट्रम्प मोठी घोषणा करतील अशी चर्चा होती. ट्रम्प यांच्या या भाषणावर जगभरातील देश लक्ष ठेवून होते. अपेक्षेप्रमाने अमेरिकन नागरिकांसाठी महत्त्वाचे व अमेरिकेच्या फायद्याचे अनेक निर्णय ट्रम्प यांनी आजच्या भाषणातून जाहीर केले. तसेच त्यांनी मेक्सिको, चीन, युक्रेन व भारत या देशांना धक्के दिले. ट्रम्प यांनी यापूर्वी २०१७ मध्ये या सभागृहाला संबोधित केलं होतं. ट्रम्प यांनी भाषणापूर्वी म्हटलं आहे की त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील सभागृहातील हे पहिलं भाषण खूप मोठं असेल. The Renewal of the American Dream ही या भाषणाची थीम असेल असेल असं ट्रम्प यांच्या कार्यालयाने म्हटलं आहे. ट्रम्प यांनी तब्बल १ तास ५६ मिनिटांचं भाषण केलं.

Live Updates

Donald Trump Speech Updates : डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणातील अपडेट्स एकाच क्लिकवर.

09:46 (IST) 5 Mar 2025

Donald Trump State of the Union Address Live Updates : ट्र्म्प यांनी मानले पाकिस्तानचे आभार

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये काही दहशतवाद्यांना पकडलं. आता त्याला अमेरिकेत आणलं जातंय. या कारवाईदरम्यान, पाकिस्तानी सरकारने आपली मदत केली. त्याबद्दल मी पाकिस्तनचे आभार मानतो.

09:17 (IST) 5 Mar 2025

Trump Speech Live Updates : पोलीस अधिकाऱ्याची हत्या केल्यास मृत्यूदंडाची शिक्षा होणार

ट्रम्प म्हणाले, मी लवकरच एका आदेशावर स्वाक्षरी करणार आहे. ज्याद्वारे पोलीस अधिकाऱ्याच्या हत्या प्रकरणातील आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाईल.

09:14 (IST) 5 Mar 2025

Donald Trump live updates : आयात शुल्क अमेरिकेला श्रीमंत होण्यास मदत करेल : ट्रम्प

ट्रम्प म्हणाले, अमेरिकेला पुन्हा श्रीमंत बनवायचं आहे आणि हीच आपली जबाबदारी आहे. आपल्याला अमेरिकेला महान बनवायचं आहे. आयात शुल्कासारख्या निर्णयांचा आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर थोडासा त्रास होईल. परंतु, त्यामुळे अमेरिकेला श्रीमंत होण्यास मदत मिळेल. टॅरिफ हा अमेरिकेला पुन्हा श्रीमंत व महान बनवण्याचा मार्ग आहे. आम्ही जसं ठरवलं होतं तसं घडत आहे आणि लवकरच आपण श्रीमंत होऊ. थोडा गोंधळ होईल पण आम्हाला ते मान्य आहे. परंतु, त्याने फार मोठा फरक पडणार नाही.

09:05 (IST) 5 Mar 2025

Trump Speech Live Updates: गोल्ड कार्ड हे ग्रीन कार्डपेक्षा उत्तम

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "अमेरिकेचं सरकार ५ मिलियन अमेरिकन डॉलर्समध्ये अमेरिकेचं गोल्ड कार्ड देत आहे. जगभरातील प्रतिभावान व कष्टाळू लोकांना याद्वारे अमेरिकेचं नागरिकत्व मिळवण्याचा मार्ग प्रदान केला जात आहे. हे ग्रीन कार्डसारखंच आहे. काही बाबतीत ग्रीन कार्डपेक्षा उत्तम आहे."

08:57 (IST) 5 Mar 2025

Trump Speech Live Updates: ट्रम्प यांचा सर्व परदेशी मदत थांबवण्याचा निर्णय

अमेरिकेडून वेगवेगळ्या देशांना दिली जाणारी परदेशी मदत पूर्णपणे थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ट्रम्प यांनी त्यावर स्वाक्षरी केली आहे. अमेरिकन नागरिकांचे पैसे अमेरिकेसाठी खर्च केले जातील असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. अमेरिकेच्या धोरणात ट्रम्प यांनी हा मोठा बदल केला आहे.

08:49 (IST) 5 Mar 2025

Trump Speech Live Updates : अमेरिकेत केवळ दोन लिंग : ट्रम्प

अमेरिकेत केवळ दोन लिंग आहेत - पुरूष व स्त्री, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. आमच्या सरकारने सरकारी शाळांमधील क्रिटिकल रेस थ्योरी नावाचं विष काढून टाकलं आहे. मी यासंबंधीच्या एका आदेशावर स्वाक्षरी केली आहे. ज्यामुळे अमेरिकन सरकारचं अधिकृत धोरण ठरलं आहे की आपल्या देशात केवळ दोनच लिंग आहेत, स्त्री व पुरूष

08:42 (IST) 5 Mar 2025
Trump Speech Live Updates : ट्रम्प यांची मोठी घोषणा; भारत व चीनवर लादले अतिरिक्त आयात शुल्क

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे. या घोषणेचे भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतात. कारण, ट्रम्प यांनी भारत व चीनवर अतिरिक्त आयात शुल्क लादलं आहे. याआधी ट्रम्प यांनी कॅनडा व मेक्सिकोवर अतिरिक्त आयात शुल्क लादलं होतं.

08:32 (IST) 5 Mar 2025

Donald Trump State of the Union Address Live Updates : ट्रम्प यांची मोठी घोषणा, गल्फ ऑफ मेक्सिकोचं नाव बदललं

ट्रम्प यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी 'गल्फ ऑफ मेक्सिको'चं नाव बदलल्याचं जाहीर केलं. हे आखात आता 'गल्फ ऑफ अमेरिका' या नावाने ओळखलं जाईल.

08:27 (IST) 5 Mar 2025

Donald Trump State of the Union Address Live Updates : डोनाल्ड ट्रम्प यांची महागाई कमी करण्यासंदर्भात घोषणा

'Make America affordable again', असं म्हणत ट्रम्प यांनी महागाई कमी करण्यासंदर्भात घोषणा दिली. याआधीचे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचा कारभार अमेरिकेतील महागाई वाढण्यास कारणीभूत होता असंही ट्रम्प यांनी यावेळी म्हटलं आहे. ट्रम्प म्हणाले, निवडून आल्यानंतर मला एक अशी अर्थव्यवस्था मिळाली आहे जिथे आपल्यासमोर आर्थिक आपत्ती उभी आहे. महागाई सर्वोच्च बिंदूपर्यंत पोहोचली आहे.

08:21 (IST) 5 Mar 2025

Trump Speech Live Updates: इंग्रजी ही अमेरिकेची अधिकृत भाषा

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, दोन दिवसांपूर्वी मी इंग्रजी भाषेला अमेरिकेची अधिकृत भाषा बनवण्यासंदर्भातील आदेशांवर स्वाक्षरी केली आहे.

08:14 (IST) 5 Mar 2025

Trump Speech Live Updates : अमेरिकन नागरिकांची स्वप्नं मोठी होतायत : ट्रम्प

Trump Speech Live Updates : अमेरिकन नागरिकांची स्वप्नं मोठी होतायत : ट्रम्प

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "अमेरिकेने पुन्हा एकदा विकासाची गती पकडली आहे. आपल्या देशाला गौरव, आत्मविश्वास व उत्साह परत मिळाला आहे. अमेरिकन नागरिक आता मोठी स्वप्नं पाहू लागले आहेत. सप्टेंबर महिन्यात अमेरिकेच्या निवडणुकीतून आपल्या जनतेने दिलेला जनादेश अविश्वस्नीय असा होता. आपण योग्य दिशेने प्रगती करत आहोत, असं बहुसंख्य अमेरिकन नागरिकांचं मत आहे."

08:09 (IST) 5 Mar 2025

ट्रम्प यांच्या भाषणात अडथळा आणल्यामुळे डेमोक्रॅट अल ग्रीन यांची सभागृहातून हकालपट्टी

ट्रम्प यांच्या भाषणात अडथळा आणल्यामुळे डेमोक्रेटिक पक्षाचे प्रतिनिधी अल ग्रीन यांना सभागृहातून बाहेर जाण्यास सांगितलं आहे. सभागृहाचे अध्यक्ष माइक जॉन्सन यांनी आदेश दिल्यानंतर ग्रीन हे सभागृहातून बाहेर पडले.

Story img Loader