US Presidential Election: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक नुकतीच काही दिवसांपूर्वी पार पडली. या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे विजयी झाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी कमला हॅरिस (Kamala Harris) यांचा पराभव केला. ट्रम्प विजयी झाल्यामुळे अमेरिकेच्या अध्यक्षपदी त्यांची दुसऱ्यांदा वर्णी लागली आहे. त्यामुळे आता जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या चाव्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या हाती असणार आहेत. अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आता सरकार चालवण्यासाठी आपल्या मंत्रिमंडळात कोण-कोण असणार? यासंदर्भात काही महत्वाचे निर्णय घेत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डोनाल्ड ट्रम्प यांनी टेस्ला प्रमुख एलॉन मस्क आणि उद्योजक विवेक रामास्वामी यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. आता ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळात एलॉन मस्क आणि विवेक रामास्वामींचा समावेश असणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी विवेक रामास्वामी आणि एलॉन मस्क यांच्यावर डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशिअन्सी (DOGE) ही जबाबदारी देण्यात आली आहे. यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा उद्देश असा आहे की, शासकीय कामकाजामध्ये आणखी सुधारणा आणणे, अनावश्यक खर्च कमी करण्याच्या पार्श्वभूमीवर काही पावलं उचलणं, नोकरशाही कमी करणे यासह आदी उद्देश समोर ठेवून त्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

हेही वाचा : SC on Bulldozer Action: ‘बुलडोझर कारवाई’बाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल; प्रक्रियेवरच उपस्थित केलं प्रश्नचिन्ह!

u

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी यासंदर्भात एक निवेदन देखील जाही केलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, विवेक रामास्वामी आणि एलॉन मस्क हे एकत्रितपणे हे माझ्या प्रशासनाला सरकारी नोकरशाही मोडून काढण्यासाठी, काही नियमांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी तसेच अनावश्यक खर्च कमी करण्यासाठी आणि फेडरल एजन्सीची पुनर्रचना करण्याचा मार्ग मोकळा करतील, असं ट्रम्प यांनी एका निवेदनात म्हटलं आहे.

सूसी विल्स यांची चीफ ऑफ स्टाफपदी वर्णी

डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांच्या प्रचार व्यवस्थापक सूसी विल्स यांना व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ म्हणून नियुक्त केलं आहे. दरम्यान, ‘चीफ ऑफ स्टाफ’ महत्वाचं पद मानलं जातं. चीफ ऑफ स्टाफ हे पद अमेरिकन सरकारमधील सर्वांत शक्तिशाली पदांपैकी एक आहे. प्रत्येक प्रशासनात त्यांची कर्तव्ये मोठ्या प्रमाणात बदलत असतात.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Donald trump news elon musk vivek ramaswamy hold key responsibilities in donald trumps cabinet gkt