अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ट्रम्प यांचा इशारा

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अध्यक्षपदी निवडून आलो तर स्थलांतरितांचे लोंढे रोखण्यासाठी मेक्सिकोला लागून असलेल्या सीमेवर उंच िभत बांधू, देशातील एक कोटी दहा लाख स्थलांतरितांपैकी बेकायदा स्थलांतरितांना अमेरिकेबाहेर हाकलून लावू, अशी अचाट आश्वासने देणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी आता या आश्वासनांच्या पूर्ततेचे संकेत दिले आहेत. अमेरिकेतील ३० लाख बेकायदा स्थलांतरितांना बाहेरचा रस्ता दाखवणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले आहे.

‘सीबीज् ६० मिनिट्स’ या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीदरम्यान ट्रम्प यांनी वरील सूतोवाच केले. ते म्हणाले, ‘अमेरिकेत बेकायदेशीरपणे वास्तव्याला असलेल्या ३० लाख स्थलांतरितांना देशाबाहेर हाकलून तरी लावेन किंवा त्यांना तुरुंगात तरी डांबेन. या स्थलांतरितांमध्ये अनेकजण गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यात गुन्हेगारी टोळीचे सदस्य, अंमली पदार्थाचा धंदा करणारे यांचाच जास्त भरणा आहे. या सर्वाना बाहेर घालवून देशाच्या सीमारेषा मजबूत करण्याचा माझा इरादा आहे आणि त्यासाठी माझे प्रशासन नक्कीच प्रयत्न करेल’. अमेरिकेतील एक कोटी दहा लाख स्थलांतरितांमध्ये बहुतांश  भारतीयांचा समावेश आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Donald trump on immigrants