वृत्तसंस्था, न्यूयॉर्क
अमेरिकेत अध्यक्षपदाची निवडणूक ऐन रंगात आली असताना, रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार तथा अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारार्थ न्यूयॉर्कच्या ‘मॅडिसन स्क्वेअर गार्डन’मध्ये आयोजित कार्यक्रमात अश्लीलता आणि वर्णद्वेषाबद्दल टिप्पणी केल्याचे समोर आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ट्रम्प निवडणूक प्रचारातील अखेरचा संदेश देणार होते. परंतु प्रचार कार्यक्रमातील वादग्रस्त टिप्पणींमुळे त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमेरिकेत ५ नोव्हेंबर २०२४ रोजी अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या एक आठवडा आधी, रविवारी रात्री ट्रम्प यांच्या रॅलीतील वक्त्यांनी कॅरेबियन बेट ‘पोर्तो रिको’ला कचऱ्याचे तरंगणारे बेट असे संबोधले. ‘मला माहीत नाही, परंतु सध्या समुद्राच्या मध्यभागी कचऱ्याचे एक तरंगते बेट आहे. मला वाटते की याला ‘पोर्तो रिको’ म्हणतात,’ असे टोनी हिंचक्लिफ म्हणाले. हिंचक्लिफ हे ‘स्टँड-अप कॉमेडियन’ असून, ज्यू आणि कृष्णवर्णीय लोकांबद्दल असभ्य आणि वर्णद्वेषी टिप्पणी केल्याबद्दल ते आधीच वादात आहेत.

हेही वाचा : ‘सी-२९५’ प्रकल्प नव्या भारताचे प्रतिबिंब! मोदी, सांचेझ यांच्या हस्ते ‘टाटाएअरबस’च्या कारखान्याचे उद्घाटन

दरम्यान, या टिप्पणीवर सर्वच स्तरातून टीका होऊ लागल्याने ट्रम्प यांच्या समर्थकांनी त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. हिंचक्लिफ यांचे हे विधान ट्रम्प किंवा त्यांच्या निवडणूक प्रचार मोहिमेचे विचार प्रतिबिंबित करत नसल्याचे वरिष्ठ सल्लागार डॅनियल अल्वारेझ यांनी एका निवेदनात म्हटले आहे. परंतु हॅरिस यांच्या समर्थकांनी या टिप्पणीवर जोरदार आक्षेप घेतला आहे. हॅरिस या पेनसिल्व्हेनिया आणि इतर राज्यांमधील पोर्तो रिकन समुदायांचा पाठिंबा मिळवत आहेत. हिंचक्लिफ यांच्या टिप्पणीनंतर पोर्तो रिकोमधील संगीत सुपरस्टार बॅड बनीने हॅरिस यांना पाठिंबा दर्शवला आहे.

हेही वाचा : जनगणना पुढील वर्षी; पुढील लोकसभा निवडणूक मतदारसंघ पुनर्रचनेनंतर घेण्याचा विचार

‘हॅरिस ख्रिास्तविरोधी आणि सैतान’

इतर वक्त्यांनीही ट्रम्प यांच्या प्रचार कार्यक्रमात हॅरिस यांच्याबद्दल जहाल वक्तव्ये केली. ट्रम्प यांचे बालपणीचे मित्र डेव्हिड रेम यांनी हॅरिस यांच्यावर ‘ख्रिास्तविरोधी’ आणि ‘सैतान’ असल्याची टीका केली. तर व्यावसायिक ग्रँट कार्डोन यांनी हॅरिस आणि त्यांचे अवैध व्यावसायिक आपल्या देशाचा नाश करतील, असे म्हटले आहे. ट्रम्प यांनी अनेकदा हॅरिस यांच्यावर आक्षेपार्ह आणि वैयक्तिक टिप्पणी केल्या आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Donald trump racist allegations on kamala harris css