Donald Trump Requested Vladimir Putin : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी आपण रशियाचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना युक्रेनियन सैनिकांना जीवंत सोडण्याची विनंती केल्याचे म्हटले आहे. गुरुवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी ‘खूप चांगली आणि उपयुक्त चर्चा’ केली आणि युक्रेनियन सैनिकांचे जीव न घेण्याचे आवाहन केल्याचे ट्रम्प म्हणाले आहेत. सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची पुतिन यांना विनंती

ट्रूथ सोशल या प्लॅटफॉर्मवर लिहीलेल्या पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले आहेत की, “रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतिन आणि आमच्यात काल खूप चांगली आणि उपयुक्त चर्चा झाली, आणि अखेर हे भयानक, रक्तरंजित युद्ध अखेर संपुष्टात येण्याची चांगली शक्यता आहे. पण पण या क्षणाला हजारो युक्रेनियन सैनिक हे पूर्णपणे रशियन लष्कराने वेढलेले आहेत, आणि ते खूप वाईट स्थितीत आहेत. मी अध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांच्याकडे त्यांना जीवंत सोडण्यासाठी विनंती केली आहे. हा एक भीषण नरसंहार असेल, जो दुसर्‍या महायुद्धानंतर कधीही पाहिला गेला नाही. देव त्या सर्वांचे रक्षण करो.”

मॉस्को येथे रशियन अधिकार्‍यांबरोबर गुप्त बैठक पार पडल्यानंतर ट्रम्प यांचे विशेष राजदूत स्टीव्ह विटकॉफ हे पुतिन यांचा संदेश घेऊन गेल्याचे विधान क्रेमलिनने केले होते. यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही पोस्ट केली आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यातील तीन वर्षांपासून सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न केले जात आहेत. याचाच भाग म्हणून अमेरिकेचे दूत म्हणून विटकॉफ हे चर्चेसाठी रशिया येथे दाखल झाले होते.

युक्रेनच्या ३० दिवसांच्या युद्धबंदीच्या प्रस्तावानंतर पुतिन यांनी त्यांच्या अटी घातल्यानंतर विटकॉफ यांनी रशियन अधिकार्‍यांशी चर्चा केल्याचे सांगितले जात आहे. पुतिन यांनी युक्रेनच्या प्रस्तावाला पूर्णपणे पाठिंबा देण्यास नकार दिला आहे, पण ट्रम्प यांच्याशी या मुद्द्यांवर चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे.

रशियाच्या अक्ष्यक्षांचे परराष्ट्र धोरण सल्लागार युरी उशाकोव्ह यांनी पुतिन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरून संभाषण होण्याची शक्यता फेटाळून लावल्यानंतर ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील संवादाला विशेष महत्त्व आले आहे.

क्रेमलिनने असेही म्हटले की, ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील फोन वरील चर्चेबाबतचा निर्णय विटकॉफ यांनी चर्चेतील माहिती पोहचवल्यावर आणि दोन्ही बाजूंना चर्चेची आवश्यकता वाटल्यास घेतला जाईल.