Donald Trump Shooting Update : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पेनसिल्व्हेनिया येथे शनिवारी गोळीबार झाला. या गोळीबारानंतर सीक्रेट सर्व्हिसकडून या हल्लेखोराला ठार मारण्यात आलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचं भाषण सुरू असताना हा शूटर छतावर रायफल घेऊन उभा होता, असं वृत्त बीबीसीने दिलं आहे. तर, आता या शूटरचा पहिला फोटोही समोर आला आहे.
डोनाल्ड ट्रम्प प्रचारसभेत जनसमुदायाला संबोधित करत होते. तेवढ्यातच गोळीबाराचा आवाज आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या कानाला चाटून गोळी (Donald Trump Shooting) गेली. परिणामी डोनाल्ड ट्रम्प यांच्या उजव्या कानातून रक्तस्राव होऊ लागला. घटनेचं गांभीर्य लक्षात घेताच सीक्रेट सर्व्हिसकडून तत्काळ डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षित करण्यात आलं आणि हल्लेखोरावर गोळीबार करण्यात आला. यामध्ये या हल्लेखोराचा मृत्यू झाला.
BREAKING: ANOTHER PHOTO OF ALLEGED PRESIDENT TRUMP SHOOTER
— Sulaiman Ahmed (@ShaykhSulaiman) July 14, 2024
Thoughts? pic.twitter.com/Yz0qHwnbES
“कार्यक्रमाच्या शेजारी असलेल्या इमारतीच्या छतावर हल्लेखोर व्यक्तीला पाहिलं. या हल्लेखोराकडे रायफल होतं. इमारतीच्या छतावर तो बराचवेळ होता. जवळपास ५० फूट अंतरावर तो आमच्यापासून लांब होता. त्यामुळे मला तेव्हाच प्रश्न पडला की ट्रम्प अजूनही का बोलत आहेत? हल्लेखोराला तत्काळ तेथून का बाहेर काढलं नाही? तेवढ्यातच गोळीबाराचा आवाज आला”, अशी माहिती एका प्रत्यक्षदर्शीने बीबीसीला दिली.
Sent by law enforcement source
— Dan Lyman (@realdanlyman) July 13, 2024
*ALLEGEDLY* body of Trump shooter pic.twitter.com/Z7YROjF2o3
Read More on Donald Trump Shooting >> Donald Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्रचारसभेत गोळीबार, गोळी चाटून गेल्याने रक्तस्राव; शूटरचा मृत्यू!
हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump Shooting) सुरक्षित असून त्यांनी सीक्रेट सर्व्हिस यांचे आभार मानले आहेत. त्यांनी तत्काळ पावलं उचलत ट्रम्प यांना सुरक्षित केल्याने पुढील अनर्थ टळला आहे.
Photo by New York Times photographer Doug Mills shows bullet flying just behind Trump's head. pic.twitter.com/0ncIBC0i1v
— The Spectator Index (@spectatorindex) July 14, 2024
Donald Trump Shooting बाबत सीक्रेट सर्व्हिसच्या प्रवक्त्यांनी काय सांगितलं?
यूएस सीक्रेट सर्व्हिसचे प्रवक्ते अँथनी गुग्लिएल्मी यांनी सांगितले की संरक्षणात्मक उपाय लागू केले गेले आहेत आणि ट्रम्प सुरक्षित आहेत. या घटनेची सध्या चौकशी सुरू आहे आणि जसजशी ती उपलब्ध होईल तसतसे अधिक माहिती जाहीर केली जाईल. माजी राष्ट्रपतींच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी सीक्रेट सर्व्हिसने सर्व आवश्यक पावले उचलली आहेत.”
#WATCH | Gunfire at Donald Trump's rally in Butler, Pennsylvania (USA). He was escorted to a vehicle by the US Secret Service
— ANI (@ANI) July 13, 2024
"The former President is safe and further information will be released when available' says the US Secret Service.
(Source – Reuters) pic.twitter.com/289Z7ZzxpX
गोळीबारानंतर डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले
ट्रम्प (Donald Trump) यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, “गोळीबारावर जलद प्रतिसाद दिल्याबद्दल युनायटेड स्टेट्स सीक्रेट सर्व्हिस आणि कायदा अंमलबजावणी यांचे आभार मानले. आपल्या देशात असे कृत्य घडणे हे अविश्वसनीय आहे. शूटर, जो आता मरण पावला आहे, याबद्दल सध्या काहीही माहिती नाही.
गोळीबाराच्या घटनेचे वर्णन करताना ट्रम्प म्हणाले की, गोळी त्यांच्या उजव्या कानाच्या वरच्या भागाला लागली. मला लगेच कळले की काहीतरी गडबड आहे.मी गोळीबाराचा आवाज ऐकला आणि माझ्या त्वचेतून काहीतरी बाहेर पडल्यासारखं वाटलं. खूप रक्तस्त्राव झाला, मग मला कळले की काय होत आहे. देव अमेरिकेला आशीर्वाद दे!”, असं ते म्हणाले.