Donald Trump address to US Congress : अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज (५ मार्च) संसदेच्या संयुक्त सत्राला पहिल्यांदाच संबोधित केलं. अमेरिकन जनतेला सुखावणारे अनेक निर्णय ट्रम्प यांनी आज जाहीर केले. दुसऱ्या बाजूला, त्यांनी मेक्सिको, चीन, ब्राझील, दक्षिण कोरिया, युक्रेन व भारत या देशांना धक्के दिले. ट्रम्प यांनी तब्बल १ तास ३० मिनिटांचं भाषण केलं. या भाषणादरम्यान त्यांनी दोन वेळा भारताचाही उल्लेख केला. अपेक्षेप्रमाणे त्यांनी आयात शुल्काच्या मुद्द्यावरून भारतावरील नाराजी उघड केली. ते म्हणाले, “भारत अमेरिकेवर १०० टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लादतो. हा काही योग्य निर्णय नाही. आम्ही देखील येत्या २ एप्रिलपासून त्यांच्यावर आयात शुल्क लादू. इथून पुढे जो देश आमच्यावर आयात शुल्क लादेल आमेरिका त्यांच्यावर तितकच किंबहुना जास्त आयात शुल्क (Reciprocal Tariff) लादेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा