हिलरी पुरुष असत्या तर पाच टक्के मतेही मिळाली नसती – ट्रम्प
रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षीय उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी अपेक्षेप्रमाणे सर्व पाच राज्यांत मंगळवारी प्राथमिक लढती जिंकल्या आहेत, तर डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी िक्लटन यांना पाचपकी चार राज्यांत विजय मिळवता आला. ट्रम्प यांना आनंदाच्या उकळय़ा फुटल्या असून, त्यांनी आपल्याला अध्यक्षपदाची उमेदवारी मिळणार यात तिळमात्र शंका नाही असे जाहीर केले आहे. रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार आता मीच दुसरे कोणी नाही असे त्यांनी कनेक्टिकट, डेलावर, मेरीलँड, पेनसिल्वानिया व ऱ्होड्स आयलंड येथील विजयानंतर सांगितले. या विजयामुळे ते विजयाच्या खूप निकट आले आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांना बर्नी सँडर्स यांनी निर्वविाद विजय मिळवू दिला नाही. व्हेरमाँटचे सिनेटर असलेल्या सँडर्स यांनी क्लिंटन यांना ऱ्होड्स आयलंड येथे पराभूत केले. फिलाडेल्फिया कन्व्हेन्शन सेंटर येथे क्लिंटन यांनी चार राज्यांतील विजयानंतर सांगितले, की माझा प्रचार अधिक ठोस व प्रागतिक दिशेने चालू आहे व त्यात प्रगती होत आहे. लोकांच्या चांगुलपणावर व देशाच्या महानतेवरही विश्वास आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी न्यूयॉर्क येथे सांगितले, की निवडून आलो तर माझी धोरणे नेभळटपणाची नसतील. मी बदलणार नाही. मी चांगल्या शाळेत शिकलेलो आहे व अगदी चतुर आहे. देशाचे अत्यंत सभ्यपणे पण ठोस असे नेतृत्व मी करीन. माझे व्यक्तिमत्त्व बदलणार नाही, त्या फंदात कुणी पडू नका.
विजयानंतर ट्रम्प व िक्लटन यांनी एकमेकांवर तोंडसुख घेतले. ट्रम्प यांनी सांगितले, की डेमोक्रॅटिक पक्षाला केवळ हिलरी या महिला असल्याने फायदा आहे. जर हिलरी पुरुष असत्या तर त्यांना पाच टक्के मतेही मिळाली नसती. हिलरी यांच्यात देशाचे अध्यक्षपद सांभाळण्यासाठी जो दम असावा लागतो तो नाही. त्या चीन, जपान, मेक्सिको व जपान या देशांना तोंड देऊ शकणार नाहीत.
ट्रम्प यांनी हिलरी यांच्यावर केवळ त्या महिला असल्याने जी टीका केली त्याचा सडकून समाचार घेताना हिलरी क्लिंटन फिलाडेल्फिया येथील सभेत म्हणाल्या, की महिलांच्या आरोग्यासाठी कौटुंबिक पगारी रजांसाठी लढणे हे जर निवडणुकीतील महिला कार्ड असेल तर ते मला खेळायचे आहे व त्याचा तुम्हालाही मुकाबला करावा लागेल.
ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी टेड क्रूझ व जॉन कसिच यांनी त्यांचे लक्ष्य पुढील लढतींकडे वळवले आहे. ते एकमेकांना मदत करणर आहेत. इंडियाना, ओरेगॉन, न्यू मेक्सिको येथे पुढील लढती होणार आहेत. क्रूझ व कॅसिच यांच्या एकीवर ट्रम्प यांनी टीका केली. ते म्हणाले, की हे कमजोरपणा व नराश्याचे लक्षण आहे. त्या दोघांपकी कुणालाही उमेदवारी मिळणार नाही. क्लिंटन यांनी सांगितले, की आमच्याकडे मोठी स्वप्ने पाहून तशी कामे करणारे लोक आहेत. हिलरी क्लिंटन यांच्याकडे २१४१ मते असून सँडर्स यांना १३२१ प्रतिनिधी मते मिळाली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा