पीटीआय, वॉशिंग्टन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला पुन्हा लक्ष्य केले असून, भारतातील निवडणुकीसाठी अमेरिकेला निधी देण्याची गरज काय, असा प्रश्न पुन्हा एकदा केला आहे. भारत अमेरिकेचा फायदा घेत असल्याचा आरोपही ट्रम्प यांनी केला. ट्रम्प भारताचा सतत अपमान करीत असताना सरकार गप्प का, असा प्रश्न काँग्रेसने सरकारला विचारला आहे.

कन्झर्व्हेटिव्ह पॉलिटिकल अॅक्शन कॉन्फरन्स’मध्ये ट्रम्प यांनी भारताला निवडणुकीसाठी दिलेल्या निधीचा पुनरुच्चार केला. भारताला असा कुठलाही निधी देण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आंतरराष्ट्रीय विकासासाठीच्या अमेरिकी संस्थेवर (यूएसएआयडी) त्यांनी टीका केली.

टम्प म्हणाले, भारताला निवडणुकीसाठी १.८ कोटी? हे काय आहे? आपण जुन्या पद्धतीने बॅलट पेपरवर मतदान घेऊन त्यांना त्यांच्या निवडणुकीसाठी मदत करतो आहोत. याला मतदान ओळखपत्र म्हणणे सयुक्तिक होईल का? भारताला अशा निधीची कुठलीही गरज नाही. ते आपला अतिशय चांगल्या पद्धतीने फायदा करून घेत आहेत. जगातील सर्वाधिक कर भारत आकारतो. आपल्याला तिथे २०० टक्के कर आहे आणि इतका कर भरल्यानंतरही आपण त्यांना निवडणुकीसाठी पैसे देतो.

टक्कावाढीसाठी अमेरिकेचा निधी नाही

अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय विकासासाठीच्या संस्थेकडून (यूएसएआयडी) २०२३-२४ मध्ये भारताला सात प्रकल्पांसाठी ७५ कोटी डॉलर निधीची तरतूद आहे. पण, त्यात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी कुठल्याही निधीचा समावेश नव्हता, अशी माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या २०२३-२४ च्या अहवालातून समोर आली आहे. अहवालात म्हटले आहे, २०२३-२४ वर्षासाठी ९.७ कोटी डॉलर (सुमारे ८२५ कोटी रुपये) देण्याचे बंधन ‘यूएसएआयडी’वर आहे. या वर्षभरात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी कुठलाही निधी दिला गेला नाही.

मूलतत्त्ववाद्यांना मतदानासाठी बांगलादेशला निधी?

ट्रम्प यांनी बांगलादेशला २.९ कोटी डॉलर निधी दिल्यावरही टीका केली. ते म्हणाले, बांगलादेशमधील राजकीय स्थिती सुधारण्यासाठी २.९ कोटी डॉलर बांगलादेशला दिले. त्यांनी मूलतत्त्ववादी अशा डाव्या कम्युनिस्टांना मतदान करावे यासाठी हा निधी दिला आहे. हा आरोप करताना ट्रम्प यांनी कुणाचेही नाव घेतले नाही.