Donald Trump Tariff Wars : अमेरिकेची सत्ता हाती येताच डोनाल्ड ट्रम्प यांनी असे काही निर्णय घेतले आहेत जे पाहून जग अचंबित झालं आहे. यापैकीच एक निर्णय म्हणजे आयात मालावरील शुल्क अर्थात टेरिफ लागू करणे. ट्रम्प यांनी शनिवारी (१ फेब्रुवारी) रात्री आदेश जारी करून कॅनडा व मेक्सिकोतून अमेरिकेत आयात होणाऱ्या मालावर २५ टक्के शुल्क किंवा टेरिफ लागू केलं आहे. टेरिफची अंमलबजावणी ४ फेब्रुवारीपासून होईल. ट्रम्प यांनी चीनवरही १० टक्के अतिरिक्त आयात शुल्क जारी केलं आहे. ट्रम्प यांनी सध्या तरी तीन देशांवर हल्लाबोल केला असला तरी ब्रिक्स राष्ट्रे त्यांचं पुढील लक्ष्य असू शकतात. यामध्ये अर्थातच भारताचाही समावेश आहे. अमेरिकी भूमीवर बेकायदा घुसखोरी आणि फेण्टानिल या वेदनाशामक औषधाची तस्करी थांबत नाही तोवर कॅनडा व मेक्सिको या देशांतून येणाऱ्या मालावर २५ टक्के टेरिफ आकारले जाईल. तसेच विद्यमान शुल्काच्या वर अतिरिक्त १० टक्के टेरिफ चिनी मालावर आकारले जाईल, असं ट्रम्प यांच्या एक्झेक्युटिव्ह ऑर्डरमध्ये म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ट्रम्प समर्थक सध्या आशा बाळगून आहेत की त्यांच्या अध्यक्षांच्या अशा निर्णयांमुळे अमेरिकेतील महागाई कमी होईल, देशात नव्या नोकऱ्या निर्माण होतील. मात्र, सध्याची स्थिती पाहता तसं काही होण्याची शक्यता कमी असल्याचं अनेकांना वाटतं. ट्रम्प यांनी त्यांच्या या निर्णयांचा प्रचार करताना म्हटलं आहे की हे टेरिफ परदेशी कंपन्या किंवा तिथली सरकारे भरतील. मात्र, प्रत्यक्षात ते सत्य नाही.

७५ टक्के अमेरिकन नागरिक अंधारात

टेरिफ हे आयातदारांना भरावं लागतं, ते कुठलंही सरकार किंवा निर्यात करणाऱ्या कंपन्या भरत नाहीत. मात्र २०२४ च्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीनंतर प्रकाशित झालेल्या एका सर्वेक्षणातून असं दिसून आलं आहे की ७५ टक्के लोकांना ही गोष्ट माहितीच नाही. त्याच लोकांनी अशा व्यक्तीला निवडून दिलं आहे जो व्यक्ती टेरिफला जादूची कांडी मानतो. तसेच आयात वस्तूंवर कर लादण्याच्या आपल्या आश्वासनाचं पालन करत ट्रम्प यांनी शनिवारी कॅनडा व मेक्सिकोपासून सुरुवात केली. या दोन देशांमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवर त्यांनी २५ टक्के कर लावला आहे. तर, चीनमधून होणाऱ्या आयातीवर आधीपासूनच कर आकारला जात असून त्यात ट्रम्प यांनी १० टक्क्यांची वाढ केली आहे.