Donald Trump Threatens Russia : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बुधवारी रशियाला धमकी दिली आहे. रशियाने जर युक्रेनविरोधात सुरू असलेले युद्ध संपवण्यासाटी तोडगा काढला नाही तर त्यांच्यावर लादण्यात आलेल्या बंधनाबरोबरच नवीन कर लादले जातील असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. तसेच हे इतर सहभागी देशांसाठी देखील लागू असेल असेही ट्रम्प म्हणाले आहेत.
सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवरील एका पोस्टमध्येट्रम्प यांनी मंगळवारी थोडा बदल केला, ज्यामध्ये ते म्हणाले की, जवळपास तीन वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी वाटाघाटी करण्यास नकार दिला तर ते रशियावर निर्बंध लादतील.
जर आपण लवकर वाटाघाटी केल्या नाहीत, तर माझ्याकडे अमेरिकेत किंवा इतर सहकारी देशांमध्ये विकल्या जाणाऱ्या कोणत्याही रशियन वस्तूंवर जास्तीचा कर, आयात शुल्क आणि निर्बंध लादण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असेही ट्रप्प म्हणाले. वॉशिंग्टन येथील रशियाचा दुतावास किंवा न्यूयॉर्क येथील मिशन टू युनायटेड नेशन्सने या प्रकरणावर कुठलेही भाष्य केलेले नाही.
ट्रम्प यांच्या या पोस्ट मध्ये इतर सहभागी देश कोणते आहेत याबद्दल कुठलीही माहिती दिलेली नाही, किंवा त्याबद्दल कोणताही खुलासाही केलेला नाही.
फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेन रशिया युद्ध सुरू झाल्यानंतर बायडन यांच्या प्रशासनाने यापूर्वीच रशियावर असंख्य निर्बंध लादले आहेत. ज्यामध्ये रशियाच्या बँकिग, संरक्षण, उत्पादन, ऊर्जा, तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रातील हजारो संस्थांचा समावेश आहे.
या महिन्याच्या सुरुवातीलाच यूएस ट्रेझरीने रशियाला मोठा झटका दिला आहे. ऑइल आणि गॅस उत्पादक गॅझप्रॉम नेफ्ट (Gazprom Neft) आणि सर्गुटनेफ्तेगॅस (Surgutneftegas) यांच्यावर आतापर्यंतचे सर्वात कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. यामाध्यामून रशियाच्या ऊर्जा क्षेत्रातील महसूलाला मोठा धक्का बसला आहे. याबरेबरच डार्क फ्लीट नावाने ओळखल्या जाणार्या १८३ जाहावर देखील निर्बंधे लादण्यात आली आहेत.
बेकायदेशीर स्थलांतर आणि युनायटेड स्टेट्समध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेली ओपिओइड फेंटॅनाइल ड्रग्जची तस्करी रोखण्यासाठी मेक्सिको, कॅनडा आणि चीनला ट्रम्प प्रशासनाकडून इशारा देण्यात आला आहे. या दोन्ही गोष्टी थांबल्या नाहीत तर या देशांच्या मालावर जास्त आयतशुल्क लादले जाईल असे ट्रम्प यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे.