राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक ही ‘रिअॅलिटी शो’ चालवण्याऐवढी सोपी नाही, त्यामुळे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे आपले वारसदार होतील, असे आपल्याला वाटत नाही, असे स्पष्ट मत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी व्यक्त केले आहे. ट्रम्प यांची अध्यक्षपदी निवड करण्यास अमेरिकेतील जनताही उत्सुक नाही, असेही ते म्हणाले.
ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड होणार नाही याची आपल्याला खात्री आहे कारण अमेरिकेच्या नागरिकांवर आपला दृढ विश्वास आहे. राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी हे किती गंभीर आव्हान आहे याचे नागरिकांना चांगलेच भान आहे, असेही ओबामा यांनी म्हटले आहे. कॅलिफोर्नियातील सन्नीलॅण्डमध्ये अमेरिका-आशिया परिषद सुरू असून तेथे ओबामा यांनी पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्राध्यक्ष हे पद एखाद्या वाहिनीवरील ‘टॉक शो’ किंवा ‘रियॅलिटी शो’ ला संबोधित करण्याएवढे सोपे नसून त्याची जाहिरात किंवा विपणन करण्यासारखे देखील नसल्याचे ओबामा म्हणाले. ट्रम्प यांनी देखील दक्षिण कॅरोलिनात प्रचारादरम्यान या टीकेला प्रत्युत्तर देताना स्पष्ट केले की, २०१२ साली मी निवडणूक लढविली नव्हती. त्यामुळेच ओबामा राष्ट्राध्यक्ष झाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा