Kamala Harris Emotional Speech After US Election Results: अवघ्या जगाचं लक्ष लागून राहिलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पाठीशी २९५ मतं आली असून कमला हॅरिस यांना २२६ मतं मिळाली आहेत. त्यामुळे विजयासाठी आवश्यक असणारा २७० मतांचा आकडा डोनाल्ड ट्रम्प यांनी पार केल्यामुळे अमेरिकेत पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांचा शासनकाळ सुरू होणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी विजयी भाषणात अमेरिकेला पुन्हा महान बनवण्याचा निर्धार व्यक्त केला असताना दुसरीकडे बुधवारी रात्री उशीरा कमला हॅरिस यांनी ट्रम्प यांच्याविरोधातील पराभवावर भावनिक वातावरणात भाष्य केलं आहे.

कमला हॅरिस यांचा भावनिक संवाद!

कमला हॅरिस यांचा पराभव झाल्याचं रात्री उशीरा अधिकृतरीत्या जाहीर झाल्यानंतर त्यांनी वॉशिंग्टन डीसीमधील त्यांच्या निवडणूक कार्यालयात उपस्थित समर्थक व पक्ष कार्यकर्त्यांसमोर भावनिक भाषण केलं. या निवडणुका व त्यांचे निकाल म्हणजे शेवट नसल्याचं त्या आपल्या भाषणात म्हणाल्या. तसेच, त्यांनी आपल्या भाषणातून उपस्थित समर्थकांना नाउमेद न होता आपल्या तत्त्वांसाठी लढत राहण्याचं आवाहन केलं आहे.

no alt text set
Gautam Adani Fraud: “आम्ही या प्रकरणातून मार्ग काढू…”; गौतम अदणींवरील आरोपांवर अमेरिकेची प्रतिक्रिया
Kenya airport deal cancelled
Kenya cancels Adani Deal: अदाणींना दुसरा झटका; केनियाने…
viral video of andhra pradesh
Viral Video : नवजोडप्याला लग्नाचा आहेर देताना मित्राचा करुण अंत; व्हायरल VIDEO मुळे खळबळ!
Gautam adani bribe
गौतम अदानींच्या अटकेची मागणी, अमेरिकेत खटले दाखल झाल्यानंतर विरोधक आक्रमक
modi receives Guyana s highest honour
पंतप्रधान मोदींना गयाना, डॉमिनिकाचा सर्वोच्च पुरस्कार
no leave blackout social viral
“तुम्ही मेलात तरी तुम्हाला तीन दिवस आधी कंपनीला सांगावं लागेल”, नेटिझन्सचा संताप; सुट्ट्या रद्द करणारी कंपनीची नोटीस व्हायरल!
Arrest warrant issued against Gautam Adani
Arrest warrant issued against Gautam Adani : गौतम अदाणींच्या विरोधात न्यूयॉर्कमध्ये अटक वॉरंट, आता काय होणार?
Pakistan Terrorist Attack :
Pakistan Terrorist Attack : पाकिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; तब्बल ५० जणांचा मृत्यू, २० पेक्षा जास्त जण जखमी
What Supreme Court Said?
Supreme Court : ब्रेक-अप झाल्यास पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

कमला हॅरिस यांनी बुधवारी दुपारी निकाल स्पष्ट होऊ लागल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना फोन करून त्यांचं अभिनंदन केलं. त्यानंतर त्यांनी रात्री त्यांच्या समर्थकांशी संवाद साधला. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी विजयाचा जल्लोष साजरा करण्याचं नियोजन केलं होतं, त्याच कार्यालयात त्यांना पराभवानंतरचं भाषण करावं लागलं.

“माझं मन आज भरून आलं आहे”

“माझ्या पराभवामुळे आपल्या सर्वांचा अपेक्षाभंग झाला. आज माझं मन भरून आलं आहे. तुम्ही सर्वांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास, आपल्या देशावरचं तुमचं प्रेम हे सगळं पाहून माझं मन भरून आलं आहे. पराभूत झाल्यानंतरही तुमच्या चेहऱ्यावर मला पुढील वाटचालीचा निर्धार दिसतोय”, असं कमला हॅरिस यावेळी म्हणाल्या.

US Election Results 2024: निवडून येताच डोनाल्ड ट्रम्प यांचं टीकाकारांना उत्तर; म्हणाले, “मी युद्ध घडवून आणणार नाही, तर…”

“या निवडणुकीचे निकाल हे आपल्याला हवे तसे लागलेले नाहीत, आपण ज्यासाठी लढा दिला तसे लागले नाहीत, आपण ज्यासाठी मतदान केलं, तसे लागलेले नाहीत. पण मी जे बोलतेय, ते लक्षपूर्वक ऐका..आपण जोपर्यंत माघार घेत नाही, आपण जोपर्यंत लढत राहू तोपर्यंत उज्ज्वल अमेरिकेचं आपलं वचन कायम असंच तेवत राहील”, असा निर्धार कमला हॅरिस यांनी यावेळी व्यक्त केला.

अवघ्या १५ मिनिटांत संपलं भाषण!

दरम्यान, विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष असणाऱ्या कमला हॅरिस यांनी पराभवानंतर केलेलं भाषण अवघ्या १५ मिनिटांत संपलं. यावेळी समर्थकांशी संवाद साधतानाच त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांचेही आभार मानले. “माझ्या कुटुंबाचे मी मनापासून आभार मानते. माझं त्यांच्यावर निस्सीम प्रेम आहे. मला पाठिंबा दिल्याबद्दल मी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन व डॉ. बायडेन यांचे आभार मानते. माझी टीम, माझे समर्थक आणि आपल्या विजयासाठी दिवस-रात्र मेहनत करणारे असंख्य कार्यकर्ते या सगळ्यांचे मी आभार मानते”, असं त्या म्हणाल्या.

“जनमताचा आदर करायला हवा”

“आपण ज्या पद्धतीने ही निवडणूक लढलो, त्याचा मला अभिमान आहे. मला माहितीये, अनेकजण सध्या भावनिक झाले आहेत. पण आपण या निवडणुकीचे निकाल स्वीकारायला हवेत. मी ट्रम्प यांना फोन करून अभिनंदन केलं आहे आणि शांततेत सत्तेचं हस्तांतर होईल याची खात्री दिली आहे. अमेरिकन लोकशाहीचं हे मूलभूत तत्व आहे की जर आपण निवडणूक हरलो तर आपण निकालांचा स्वीकार करतो. लोकशाहीला जुलूमशाहीपासून वेगळं करणारं हे तत्त्व आहे. जर तुम्ही लोकांचा कौल मागत असाल, तर त्यांनी दिलेल्या कौलाचा आदरही ठेवायला हवा. आपल्या देशात आपली बांधीलकी एखाद्या राष्ट्राध्यक्षाशी किंवा एखाद्या पक्षाशी नसून अमेरिकेच्या राज्यघटनेशी आहे. आपल्या सदसदविवेकबुद्धीशी आपण बांधील आहोत”, असंही कमला हॅरिस यावेळी म्हणाल्या.

अग्रलेख: तो परत आलाय…

“मी अशा अमेरिकेसाठी प्रयत्न करत राहीन जिथे महिलांना त्यांच्या शरीराबाबतचा निर्णय घ्यायचा अधिकार असेल आणि सरकार त्यांना सांगत नसेल की काय करायला हवं. आपल्या शाळा आणि रस्त्यांवर गोळीबार होऊ नये यासाठी आपण लढा देत राहू. आपल्या लोकशाहीसाठी, कायद्याच्या राज्यासाठी, समान न्यायासाठी आणि मूलभूत अधिकार व स्वातंत्र्यासाठी आपण लढा देत राहणार आहोत”, अशा शब्दांत कमला हॅरिस यांनी आपल्या समर्थकांना विश्वास दिला.

“आपण जिंकलो नाही याचा अर्थ कधीच जिंकणार नाही असा नाही”

“मी सगळ्या तरुणांना सांगेन की अशा निकालानंतर वाईट वाटणं स्वाभाविक आहे. निराश वाटणं साहजिक आहे. मी सांगते, कधीकधी लढा पूर्ण व्हायला वेळ लागतो. पण त्याचा अर्थ असा नाही की आपण कधीच जिंकणार नाही. इथे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण प्रयत्न करणं सोडता कामा नये. तुमच्यात ताकद आहे. जर कुणी तुम्हाला सांगत असतील की एखादी गोष्ट शक्य नाही कारण ती आधी कधी घडलेली नाही, तर त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. ही वेळ हार मानण्याची नसून बाह्या सरसावून कामाला लागण्याची आहे”, असं आवाहन त्यांनी अमेरिकेतील तरुणांना केलं आहे.