वृत्तसंस्था, प्रतिनिधी

वॉशिंग्टन / मुंबई चुरशीच्या लढतीविषयीचे सारे अंदाज फोल ठरवत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रतिस्पर्धी कमला हॅरिस यांचा सहज पराभव केला आणि दुसऱ्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष बनण्याचा मान मिळवला. महाभियोग, विविध फौजदारी खटले, बुद्धिजीवींकडून होणारी टीका, महिलांविषयी हीन टिप्पणी, हत्येचे प्रयत्न असे अनेक घटक ट्रम्प यांचा आत्मविश्वास तोडू शकले नाहीत आणि त्यांना असलेला जनाधार घटवू शकले नाहीत. अमेरिकेचे ४७वे अध्यक्ष म्हणून ते जानेवारी महिन्यात शपथ घेतील.

The Supreme Court directed the Ajit Pawar group from the clock symbols
‘घड्याळ’ न्यायप्रविष्ट असल्याचे जाहीर करा! सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला पुन्हा बजावले
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
kamala harris speech after defeat from donald trump
Video: डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध पराभूत झाल्यानंतर कमला हॅरिस यांचं भावनिक भाषण; म्हणाल्या, “या निवडणुकीचे परिणाम…”
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा

गेल्या खेपेस डेमोक्रॅटिक पक्षाच्या ताब्यात असलेली पेनसिल्वेनिया, जॉर्जिया आणि विस्कॉन्सिन ही मोक्याची राज्ये (स्विंग स्टेट्स) ट्रम्प यांच्या झंझावाताने रिपब्लिकन पक्षाकडे खेचून आणली. त्यामुळे गेल्या वेळी जो बायडेन यांना या राज्यांतून मिळालेली ४५ प्रातिनिधिक मते (इलेक्टोरल वोट्स) ट्रम्प यांच्याकडे सरकली. ती निर्णायक ठरली.

हेही वाचा >>>अध्यक्षपदाच्या दुसऱ्या कार्यकाळातील धोरणांवर जगाचे लक्ष

याशिवाय नॉर्थ कॅरोलिना हे राज्य आपल्याकडेच राखण्यात त्यांनी यश मिळवले. हॅरिस यांच्या प्रचारयंत्रणेने लोकशाही, गर्भपात, अर्थव्यवस्था, ट्रम्प यांची महिलांविषयीची मते या मुद्द्यांवर भर दिला. पण स्थलांतरितांविषयी ट्रम्प यांनी उठवलेले रान, हत्येच्या प्रयत्नांमुळे त्यांना मिळालेली सहानुभूती, चाचपडत्या बायडेनना ऐनवेळी बदलून हॅरिस यांना उमेदवारी द्यावी लागल्यामुळे पुरेशा तयारीचा अभाव हे घटक रिपब्लिकन मतदारांवर मोठ्या प्रमाणावर प्रभाव पाडून गेले. पारंपरिक ज्येष्ठ, गोरे, ग्रामीण व निमशहरी मतदार राखतानाच ट्रम्प यांनी लॅटिनो व आफ्रिकन पुरुष, पदवी नसलेला युवा वर्ग असे नवे मतदार जोडले. याउलट मोठ्या प्रमाणावर महिलांचा पाठिंबा विजयामध्ये परिवर्तित करण्यात कमला हॅरिस अपयशी ठरल्या. तसेच, त्यांना मुस्लीम मतदारांच्या रोषाचा फटकाही बसला. नव्याने आणि अचानक उमेदवारी स्वीकारावी लागल्यामुळे आर्थिक धोरणे, आंतरराष्ट्रीय धोरणे यांविषयी नेमकी भूमिका मांडण्यात त्या अपयशी ठरल्या. आपली भारतीय-आफ्रिकी पार्श्वभूमी व त्या माध्यमातून स्थलांतरितांची यशोगाथा कथन करण्याचा त्यांचा पवित्रा ट्रम्प यांच्या टोकाच्या स्थलांतरितविरोधी प्रचारासमोर फिका पडला.

डेमोक्रॅटिक पक्षातर्फे या निवडणुकीत हॅरिस यांच्या रूपाने दुसऱ्यांदा महिला उमेदवारास संधी देण्यात आली. पण २०१६मध्ये हिलरी क्लिंटन यांच्याप्रमाणेच यंदाही अमेरिकेच्या अध्यक्षपदी महिला निवडून येण्याची संधी हुकली.

हेही वाचा >>>जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देण्याचा ठराव मंजूर; विधानसभेत जोरदार खडाजंगी

ट्रम्प यांचा प्रचंड जनाधार आजही अबाधित असल्याचे या निवडणुकीच्या निमित्ताने दिसून आले. ६ जानेवारी २०२१ रोजी अमेरिकी काँग्रेसच्या कॅपिटॉल इमारतीवरील हल्ल्यास चिथावणी देऊन त्यांनी जनमताचा कौल उधळण्याचा आणि देशाची घटनात्मक प्रतीके उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्याविरोधात चार खटले सुरू आहेत. पण या कशाचाही परिणाम त्यांच्या मतदारांवर झाला नाही.

सलग तीन निवडणुकांमध्ये ट्रम्प लढले. त्यांतील दोन त्यांनी जिंकून दाखवल्या. दुसऱ्या प्रयत्नात ते अमेरिकेचे सर्वांत वयोवृद्ध अध्यक्ष म्हणून निवडून आले. यंदाच्या त्यांच्या विजयाचे वैशिष्ट्य म्हणजे, केवळ प्रातिनिधिक मते नव्हे तर प्रत्यक्ष मतेही त्यांना हॅरिस यांच्यापेक्षा अधिक मिळाली. २००४नंतर प्रथमच अशा प्रकारे रिपब्लिकन उमेदवाराला डेमोक्रॅटिक प्रतिस्पर्ध्यापेक्षा अधिक मते मिळाली आहेत.

ट्रम्प यांच्या निवडीमुळे अमेरिकेचे परराष्ट्र धोरण, आर्थिक धोरण यांतील संभाव्य बदलांची आणि त्यांतील धोक्यांची चर्चा सुरू झाली आहे. ट्रम्प आणि त्यांचे समर्थक यांना अर्थातच याची फिकीर सध्या तरी वाटत नाही. अभूतपूर्व आनंद साजरा करण्यातच त्यांनी संध्याकाळ व्यतीत केली. पराभूत उमेदवार कमला हॅरिस या बुधवारी समर्थकांसमोर आल्याच नाहीत. त्या लवकरच समर्थकांशी संवाद साधतील, असे सांगण्यात आले.

हॅरिस यांच्या विरोधात

● गर्भपात, लोकशाहीविषयी थंड जनमत

● स्थलांतरितांबाबत प्रतिवादाचा अभाव

● महिलांकडून पुरेसे मतदान नाही

● मुस्लीम मतदारांचा रोष

ट्रम्प यांच्या पथ्यावर

● स्थलांतरितविरोधी प्रचार

● रूढीवादी गोरे मतदार

● हल्ल्यातून बचावल्याने सहानुभूती

● अर्थव्यवस्थेविषयी प्रचार

● लॅटिनो, आफ्रिकन नवमतदार

● ट्रम्प यांच्याकडून मतदारांचे आभार

● अमेरिका प्रथम’ धोरणाचा भारतीय व्यापाराला फटका?

● ट्रम्प यांच्यावरील खटल्यांचे काय?

● अमेरिकेच्या राजकीय इतिहासात प्रथमच…

● दुसऱ्या कार्यकाळातील धोरणांवर लक्ष

● पर्यावरणवादी चिंतेत

● जगभरातील नेत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया

अमेरिकेचा सुवर्णकाळ आता परत येणार असून देशाच्या ‘जखमा’ मी भरणार आहे. अमेरिकेला पुन्हा महान बनविण्यासाठी झालेला हा शानदार विजय आहे. अनेकांनी मला सांगितले, की देवाने मला एका कारणासाठी वाचविले आहे. ते कारण म्हणजे देशाला वाचविणे, पुन्हा महान बनविणे… आता आपण हे उद्दिष्ट एकत्रितपणे साध्य करूया-डोनाल्ड ट्रम्प, नियोजित अध्यक्ष, अमेरिका

ऐतिहासिक निवडणूक विजयाबद्दल माझे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांचे मन:पूर्वक अभिनंदन. भारत-अमेरिका सर्वंकष जागतिक आणि सामरिक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी नव्याने सहकार्यासाठी मी उत्सुक आहे. एकत्रितरीत्या आपण आपल्या जनतेच्या भल्यासाठी आणि जागतिक शांतता, स्थैर्य व भरभराटीला चालना देण्यासाठी काम करूया. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान