भारतीय महासंघाचे अध्यक्ष आणि खासदार बृजभुषण सिंहवर लैंगिक अत्याचाराचे आरोप करण्यात आले आहेत. महिला कुस्तीपटूंनी त्याच्यावर आरोप केले आहेत. महिला कुस्तीपटूंनी केलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने साक्षी मलिक, विनेश फोगाट, बजरंग पुनिया या कुस्तीपटूंनी जंतर मंतरवर आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला देशभरातून अनेक खेळाडूंनी पाठिंबा दर्शवला आहे. त्याचप्रमाणे आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही पाठिंबा दर्शवला आहे. तसंच, केंद्र सरकारलाही इशारा दिला आहे.

हेही वाचा >> लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर ब्रिजभूषण सिंह उत्तर प्रदेश निवडणुकीच्या प्रचारातून बाहेर

Manmohan Singh is the second Prime Minister to visit Deekshabhoomi after Atal Bihari Vajpayee
अटलबिहारी वाजपेयींनंतर दीक्षाभूमीला भेट देणारे डॉ. मनमोहन सिंग दुसरे पंतप्रधान होते
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Indian Women On Course For Clean Sweep Against West Indies
भारताचे निर्भेळ यशाचे लक्ष्य; वेस्ट इंडिज महिला संघाविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना आज
minister dhananjay munde meet cm devendra fadnavis over murder of sarpanch santosh deshmukh
आरोपांनंतर धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
ishwar allah tero naam bhajan news
Protest on Bhajan: ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ भजनावर आक्षेप घेत घोषणाबाजी; अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात गोंधळ!
Underground sewage Scheme , Sulabha Khodke ,
अमरावती : आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली… ‘हे’ आहे कारण
Government Nursing Training School , Bhandara ,
भंडारा : गुण वाढवण्यासाठी प्राचार्यांनी विद्यार्थिनींकडे केली शरीरसुखाची मागणी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्वीटद्वारे केंद्र सरकारला इशारा दिला आहे. “अशाप्रकारे आपल्या मुलींच्या इज्जतीला धक्का लावणे अत्यंत लाजिरवाणे आहे. भारत आपल्या मुलींच्या पाठीशी उभा आहे आणि एक माणूस म्हणून मी नक्कीच आमच्या कुस्तीपटूंच्या पाठीशी उभी आहे. कायदा सर्वांसाठी एक आहे. “राज्यकर्त्यांचा कायदा लढवय्यांचा सन्मान कमी करू शकत नाही. तुम्ही त्यांच्यावर हल्ला करू शकता पण त्यांचा आत्मा तोडू शकत नाही. लढा योग्य आहे आणि लढा सुरूच राहणार आहे. आमच्या कुस्तीपटूंना दुखावण्याची हिंमत करू नका, देश त्यांचे अश्रू पाहत आहे आणि देश तुम्हाला माफ करणार नाही. मी आमच्या कुस्तीपटूंना मजबूत राहण्याचा आग्रह करते, मी माझी सर्व शक्ती त्यांच्यासोबत सामायिक करते”, असं ट्वीट ममता बॅनर्जी यांनी केलं आहे.

बृजभुषण सिंह प्रचारापासून लांब

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशमधील कैसरगंज लोकसभा मतदारसंघाचे खासदार ब्रिजभूषण सिंह हे सध्या उत्तर प्रदेशमध्ये होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारापासून लांब राहिलेले दिसत आहेत. महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर ब्रिजभूषण सिंह अडचणीत सापडले आहेत. मागच्या दहा दिवसांपासून सिंह स्वतःच्या गोंडा जिल्ह्यातही प्रचारासाठी उतरले नसल्याचे दिसते. उत्तर प्रदेशात होत असलेल्या निवडणुकीसाठी भाजपाने राज्यातील सर्व खासदार, आमदार यांना प्रचाराची जबाबदारी दिली आहे. जाहीर सभा, घरोघरी प्रचार करण्यासाठी भाजपाचे लोकप्रतिनिधी मैदानात उतरले असताना ब्रिजभूषण सिंह मात्र प्रचारापासून दूर आहेत, अशी माहिती भाजपामधील सूत्रांनी दिली.

तर पुरस्कार परत करू

“दिल्ली पोलीस ब्रिजभुषण शरण सिंह यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या व्यक्तीविरोधात आम्ही तक्रार दाखल केली. त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. मात्र, देशासाठी पदकं जिंकणाऱ्या खेळाडूंबरोबर गैरवर्तन केलं जातंय. जर सरकारला आमचा आदर करता येत नसेल, तर आम्ही सर्व पदकं परत करू”, असे बजरंग पुनिया म्हणाले.

Story img Loader