तैवानला पाणबुडी तंत्रज्ञान देण्यास चीनने विरोध केला आहे. भारत आणि अन्य देशांना तैवानला पाणबुडी तंत्रज्ञान द्यायचे आहे. तैवानला जे देश अशा प्रकारचे तंत्रज्ञान देतील त्यांच्याबरोबर आमचे राजनैतिक संबंध खराब होऊ शकतात असे चीनने म्हटले आहे. एकप्रकारे चीनने हा इशारा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तैवानला पाणबुडीचे तंत्रज्ञान देण्यासाठी भारत, जापान आणि अमेरिका हे देश पुढे आले आहेत. संबंधित देशांनी वन चायना धोरणाचे पालन करावे व तैवान बरोबर लष्करी संबंध विकसित करु नयेत असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते ह्युआ च्युनयिंग यांनी सांगितले.

तैवानवर हक्क सांगणाऱ्या चीनने नेहमीच अन्य देशांना तैवानबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्याला विरोध केला आहे. तैवानला पाणबुडी तंत्रज्ञान देण्यास गंभीर असलेल्या देशांनी तैवानचा विषय समंजसपणे हाताळावा. द्विपक्षीय संबंध आणि शांतता बाधित होणार नाही याची काळजी घ्यावी असे ह्युआ यांनी म्हटले आहे.