मोबाईलचे नवीन सिमकार्ड देताना ग्राहकाच्या बोटांचे ठसे घेणे मोबाईल कंपन्यांना बंधनकारक करण्याच्या प्रस्तावाचा केंद्रीय दूरसंचार मंत्रालय अभ्यास करीत असल्याची माहिती दूरसंचार राज्यमंत्री मिलिंद देवरा यांनी लोकसभेत विचारलेल्या एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
देशातील सर्व मोबाईल धारकांची सविस्तर माहिती दूरसंचार मंत्रालयाने संग्रहित करावी, अशी सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने केली आहे. ही सर्व माहिती आधार कार्डांशी जोडण्याची सूचनाही कऱण्यात आलीये. त्या पार्श्वभूमीवर दूरसंचार मंत्रालय मोबाईल कंपन्यांना नव्या ग्राहकांचे बोटांचे किंवा अंगठ्याचे ठसे घेणे बंधनकारक करण्यावर विचार करीत आहे. कोणताही ग्राहक नवीन सिमकार्डसाठी अर्ज करेल, त्याचवेळी त्याच्या बोटांचे किंवा अंगठ्याचे ठसे घेण्यात यावेत, यावर विचार सुरू असल्याचे देवरा यांनी म्हटले आहे. यासंदर्भात अजून कोणताही निर्णय झालेला नसून, सध्या सर्व शक्यतांचा विचार सुरू असल्याचे देवरा यांनी स्पष्ट केले.

Story img Loader