India Former Prime Minister Dr. Manmohan Singh Funeral Live Updates : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे २६ डिसेंबर रोजी दिल्लीतील एम्समध्ये ९२ व्या वर्षी निधन झाले. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या स्मरणार्थ देशभरात सात दिवसांचा राजकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. दोन वेळा पंतप्रधान राहिलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांना भारतात केलेल्या आर्थिक सुधारणांमुळे त्यांना आदराचे स्थान होते. माजी पंतप्रधानांच्या डॉ. मनमोहन सिंग यांच्या पश्चात पत्नी गुरशरण कौर आणि तीन मुली असा परिवार आहे. १९३२ मध्ये पाकिस्तानातील पंजाबमध्ये जन्मलेले मनमोहन सिंग २००४ मध्ये काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर पहिल्यांदा पंतप्राधान झाले होते. त्यानंतर २००९ मध्ये ते पुन्हा एकदा पंतप्रधान झाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आदरांजली वाहिली. सिंग यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्य मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल उपस्थित होते.
Dr. Manmohan Singh Dies LIVE Updates : “देशाला त्यांच्या मार्गदर्शनाची गरज असताना ते आपल्याला सोडून गेले”, मनमोहन सिंग यांच्या निधनावर तुषार गांधींची खंत
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनावर महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी खंत व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे. देशाला त्यांच्या मार्गदर्शनाची आणि दूरदृष्टीची गरज असताना ते आपल्याला सोडून गेले.”
Dr. Manmohan Singh Dies LIVE Updates : डॉ. मनमोहन सिंग यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून आदरांजली
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निवसस्थानी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी त्यांनी मनमोहन सिंग यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
Dr. Manmohan Singh Dies LIVE Updates : माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून मनमोहन सिंग यांना आदरांजली
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. यावेळी त्यांनी मनमोहन सिंग यांचे वर्णन भारतीय अर्थव्यवस्थेचे ‘शिल्पकार’ असे केले.
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, “डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन हा देशासाठी केवळ धक्काच नाही तर माझे वैयक्तिक नुकसानही आहे. मी त्यांना खूप दिवसांपासून ओळखतो. ते सभ्यतेचे उदाहरण होते. याचबरोबर ते भारतीय अर्थव्यवस्थेचे शिल्पकारही होते.”
Dr. Manmohan Singh Dies LIVE Updates : “आमच्यामध्ये जास्त बोलणे नव्हते, पण आम्ही चांगले मित्र होतो,” मनमोहन सिंग यांच्या आठवणीत वर्गमित्र भावूक
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल त्यांचे मित्र एच आर चौधरी यांनी शोक व्यक्त केला. ते म्हणाले, “आम्ही १९५२ मध्ये अमृतसरच्या हिंदू कॉलेजमध्ये वर्गमित्र होतो. आम्ही गणितातील कठीण प्रश्न एकत्र बसून सोडवायचो. आम्ही एकत्र शिकलो. पुढे मी अमेरिकेला गेल्यामुळे आमच्यामध्ये जास्त बोलणे होत नव्हते, पण ते माझे मित्र होते.”
#WATCH | Chandigarh | On the demise of former PM Manmohan Singh, his friend HR Choudhary says, "…We were classmates in the Hindu College Amritsar in 1952. We used to solve difficult problems in mathematics together…We studied together…As I went to America, we didn't talk… pic.twitter.com/01qiJcQ2e0
— ANI (@ANI) December 27, 2024
Dr. Manmohan Singh Dies LIVE Updates : मनमोहन सिंग यांचे जीवन येणाऱ्या पिढ्यांसाठी आदर्श : पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाचे मोठे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. मोदींनी मनमोहन सिंग यांचे भारताच्या विकासातील योगदानबद्दल कौतुक केले. “चिकाटीने संकटांवर कशी मात करता येते हे येणाऱ्या पिढ्यांना मनमोहन सिंग यांच्या जीवनाकडे बघून शिकता येईल”, असेही ते म्हणाले
Dr. Manmohan Singh Dies LIVE Updates : देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा, मनमोहन सिंग यांच्यावर आज होणार अंत्यसंस्कार!
भारताचे माजी पंतप्रधान, अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. वृद्धापकाळाने त्यांची दिल्लीतील एम्स रुग्णालयात प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने अवघ्या देशावर शोककळा पसरली आहे. त्यामुळे आज (२७ डिसेंबर) आयोजित केलेले सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यांच्यावर आज शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती पीटीआयने दिली आहे.
Dr. Manmohan Singh Dies LIVE Updates : “त्यांचे जाणे आपल्या सर्वांसाठी मोठे नुकसान”, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून मनमोहन सिंग यांना आदरांजली
“देशसेवेसाठी, त्यांच्या निष्कलंक राजकीय जीवनासाठी आणि अत्यंत नम्रतेसाठी ते नेहमीच स्मरणात राहतील. त्यांचे जाणे आपल्या सर्वांसाठी मोठे नुकसान आहे”, अशा शब्दांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहिली आहे.
Dr. Manmohan Singh Dies LIVE Updates : मनमोहन सिंग म्हणाले होते, “मी Accidental PM च नाही, तर अर्थमंत्रीही…”
२०१९ मध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं ‘चेजिंग इंडिया’ या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. त्यावेळी मनमोहन सिंग म्हणाले होते, मला देशात अॅक्सिडेंटल पीएम म्हटलं गेलं. मला तर वाटतं की मी अॅक्सिडेंटल अर्थमंत्रीही होतो. त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतो ज्यात मनमोहन सिंग यांनी ते अर्थमंत्री कसा झालो ते सांगितलं होतं.
Dr. Manmohan Singh Dies LIVE Updates : डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहण्यासाठी सोनिया गांधी त्यांच्या निवासस्थानी दाखल
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहण्यासाठी काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाल्या आहेत.