देशात सोमवारी पार पडलेल्या राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या द्रौपदी मुर्मू यांचा विजय होणार की विरोधकांचे संयुक्त उमेदवार माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा राष्ट्रपती पदी विराजमान होणार हे आज मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. देशाचे १६ वे राष्ट्रपती निवडण्यासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीमध्ये ९९ टक्के लोकप्रतिनिधींनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला होता. देशातील १० राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात १०० टक्के मतदान पार पडले. राष्ट्रपतीपदासाठी ७७१ खासदार आणि ४०२५ आमदारांसह ४७९६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. त्यामुळे आज या निवडणुकीचा निकाल काय लागतो याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे.
नक्की वाचा >> Presidential Election: …म्हणून अर्थमंत्री निर्मला सीतारमन आणि ‘या’ केंद्रीय मंत्र्याने PPE किट घालून केलं नव्या राष्ट्रपतींसाठी मतदान
Presidential Election: आज मतमोजणी; द्रौपदी मुर्मू की यशवंत सिन्हा? भारताला मिळणार नवीन राष्ट्रपती
सोमवारी झालेल्या निवडणुकीमध्ये ९९ टक्के लोकप्रतिनिधींनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 21-07-2022 at 08:34 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Draupadi murmu vs yashwant sinha india to get its new president counting of votes today scsg