महाराष्ट्र एटीएसने काही दिवसांपूर्वी डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना अटक केली आहे. हेरगिरी आणि संशयित हॅनिट्रॅप प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. कुरुलकर हे सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. या हेरगिरी प्रकरणात डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नुकतंच आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रात कुरुलकर यांच्याविरोधात असंख्य आरोप लावले आहेत. याबाबतचं व्हॉट्सॲप चॅट आता समोर आले आहेत. ३० जून रोजी पुण्यातील विशेष न्यायालयात एटीएसने आरोपपत्र दाखल केलं आहे.

कुरुलकरांनी व्हॉट्सॲप चॅटींगद्वारे देशाच्या संरक्षणाबाबतची संवेदनशील माहिती पाकिस्तानी एजंटला पाठवल्याचं एटीएसच्या आरोपपत्रात म्हटलं आहे. कुरुलकरांनी भारतीय क्षेपणास्त्र प्रणाली, गोपनीय प्रकल्प, ड्रोन आणि डीआरडीओच्या शास्त्रज्ञांच्या कामाचं वेळापत्रक आदींची माहिती पाकिस्तानी गुप्तचर एजंटला दिली. संबंधित पाकिस्तानी एजंटचं नाव ‘झरदास गुप्ता’ असल्याचं समजलं आहे. एवढंच नव्हे तर आरोपी कुरुलकर यांनी डीआरडीओच्या नियमांचे उल्लंघन करून आपल्या फोनमध्ये त्यांच्या कामाशी संबंधित गोपनीय आणि संवेदनशील कागदपत्रे संग्रहित केली होती.

Bigg Boss 18
अशनीर ग्रोव्हरच्या ‘त्या’ वक्तव्यावर भडकला सलमान खान; विचारले खरमरीत प्रश्न
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Salman Khan denies association with The Great Indian Kapil Show
“कुठे थांबायचं याचा विसर…”, भावना दुखावल्याने कपिल शर्माच्या शोमुळे सलमान खानला कायदेशीर नोटीस? अभिनेत्याने दिलं स्पष्टीकरण
Bigg Boss 18 Avinash Mishra and Digvijay Rathee will be seen getting into a physical spat during a task
Bigg Boss 18: टास्कदरम्यान अविनाश मिश्राचा संयम सुटला, जोरात धक्का मारून दिग्विजय राठीला किचनमध्ये पाडलं, व्हिडीओ होतोय व्हायरल
korean spy and zombie movies ott a hard day
झॉम्बीजचा भयानक थरार ते गुप्तहेरांच्या गूढ कथा, OTT वरील ‘या’ वेब सीरिज पाहून उडेल थरकाप
UP CM Yogi Adityanath
Yogi Adityanath : ‘बटेंगे तो कटेंगे’ हा नारा देऊन योगी आदित्यनाथ यांनी काय साधलं?
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!

पाकिस्तानी एजंटशी केलेल्या एका व्हॉट्सॲप चॅटमध्ये कुरुलकर कथितपणे लिहितात, “त्या लाँचरचं डिझाइन मी केलं होतं, बेबी. हे लाँचर डिझाइन करणं माझ्यासाठी महान यश होतं.” आणखी एका चॅटमध्ये कुरुलकर यांनी कथितरित्या म्हटलं की, ‘ॲस्ट्रा क्षेपणास्त्र’ (Astra missile) हे ‘मेटियर’ (Meteor) क्षेपणास्त्रापेक्षा अचूक आहे.

कुरुलकर आणि ‘झारा’ यांच्यात झालेल्या व्हॉट्सॲप चॅट्समध्ये ‘ब्रह्मोस’, अग्नी-६, रुस्तम (मध्यम पल्ल्याचं मानवरहित हवाई क्षेपणास्त्र), ‘सरफेस टू एअर मिसाईल्स’ (एसएएम- जमिनीवरून हवेत हल्ला करणारं क्षेपणास्त्र), मानवरहित ‘कॉम्बॅट एअर व्हेइकल्स’ (यूसीएव्ही) , DRDO चा ड्रोन प्रकल्प अशा विविध संवेदनशील प्रकल्पांच्या माहितीची देवाणघेवाण झाली आहे. याशिवाय क्वाडकॉप्टर, डीआरडीओ ड्युटी चार्ट, मेटियर क्षेपणास्त्र, राफेल, आकाश आणि ॲस्ट्रा क्षेपणास्त्रबाबतची माहिती लीक करण्यात आली आहे. तसेच एका खासगी भारतीय संरक्षण कंपनीच्या कार्यकारिणीचाही उल्लेख चॅटींगमध्ये करण्यात आला आहे.

पाकिस्तानी एजंटने कुरुलकर यांना व्हिडीओ कॉल करण्यासाठी त्यांच्या फोनमध्ये “bingechat.net” आणि “cloudchat.net” असे ॲप डाउनलोड करण्यास सांगितलं होतं, हेही आरोपपत्रात नमूद केलं आहे.