विमानाच्या कॉकपिटखाली असलेल्या बॅटरीला आग लागण्याचा धोका असलेला दोष दूर होईपर्यंत ड्रीमलायनर या विमानांची उड्डाणे तात्पुरती थांबवावीत, अशा सूचना फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने (एफएए) या अमेरिकेच्या नियमनाने दिल्याने एअर इंडियाच्या ताफ्यातील सहा विमानांसह जगभरातील बोइंग ७८७ ड्रीमलायनर जातीच्या ५० विमानांच्या ताफ्याची उड्डाणे गुरुवारी थांबविण्यात आली.
जपानमध्ये ड्रीमलायनर विमानाच्या बॅटरीला आग लागल्यानंतर एफएएने तातडीने आदेश दिले असून हा दोष दूर होईपर्यंत सदर विमानांची उड्डाणे तात्पुरती स्थगित ठेवण्यास सांगितले आहे. उड्डाणे पुन्हा सुरू करण्यापूर्वी एफएएला विमानांची चाचणी देऊन बॅटरी सुरक्षित असल्याची खात्री करून द्यावी लागणार आहे.
सदर जातीच्या विमानांचे उत्पादक आणि वाहतूकदार यांच्यासमवेत काम करून योग्य कृती आराखडा तयार करून विमानांची उड्डाणे शक्य तितक्या लवकर आणि सुरक्षित होतील, याची खातरजमा केली जाईल, असे एफएएने म्हटले आहे. तथापि, यासाठी कोणतेही वेळापत्रक आखण्यात आलेले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा