सोनेतस्करी प्रकरणी अटकेत असलेली दाक्षिणात्य अभिनेत्री रान्या रावचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. तिने नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२४ मध्ये दुबईतून दोनवेळा सोने खरेदी केली होती. तसंच, ती स्वित्झर्लंडच्या जिनेव्हाला जाणार असल्याचं तिने कस्टम विभागाला सांगितलं होतं. परंतु ती भारतात आली, असं महसूल गुप्तचर संचालनालयने (DRI) म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

३ मार्च रोजी संध्याकाळी बेंगळुरू विमानतळावर रावला ताब्यात घेतल्यानंतर तिची चौकशी सुरू आहे. तिच्या अटकेनंतर, बेंगळुरू महसूल गुप्तचर संचालनालयाने छापे टाकून तिच्या टेक सिटीमधील घरातून २.०६ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि २.६७ कोटी रुपये रोख जप्त केले. सोमवारी न्यायालयाने रावला २४ मार्चपर्यंत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. सीएनएन-न्यूज१८ ने मिळवलेल्या तिच्या अटक मेमोमध्ये, डीआरआयने म्हटले आहे की रावने १३ नोव्हेंबर आणि २० डिसेंबर रोजी दुबईमध्ये सोने खरेदी केले होते आणि ती जिनिव्हाला जात असल्याचे जाहीर केले होते.

परंतु अटक मेमोनुसार ती भारतात आली होती. रावने कबूल केले आहे की तिच्या अटकेपूर्वी तिने दुबईहून भारतात कमीत कमी दोन वेळा सोने आणले होते. डीआरआय अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की तिने सुमारे ४.८३ कोटी रुपयांचे कस्टम ड्युटी चुकवली आहे.तसंच, रान्या रावने केवळ दुबईच नव्हे तर युरोप, अमेरिका आणि मध्य पूर्वेतही दौरा केला आहे. तथापि, तिने अधिक माहिती देण्यास नकार दिला.

नेमकं प्रकरण काय?

कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री रान्या रावला बंगळुरुच्या कॅम्पेगौडा विमानतळावर मागच्या आठवड्यात अटक करण्यात आली. तिच्याकडून १४.८ किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे. या सोन्याची किंमत जवळपास १२ कोटी रुपयांहून अधिक आहे. रान्या रावने मागच्या वर्षभरात गल्फ देशांमधल्या १० तरी फेऱ्या केल्या आहेत. तसंच ५ मार्चच्या आधीच्या १५ दिवसांत ती चार वेळा दुबईला जाऊन आली. त्यामुळे ती तपास यंत्रणांच्या रडारवर आली. त्यानंतर तिच्यावर नजर ठेवण्यात आली. रान्या मंगळवारी जेव्हा दुबईहून बंगळुरुला पोहचली तेव्हा तिला पोलिसांनी आणि तपास यंत्रणांनी थांबवलं. तिच्या झडतीत पोलिसांना सगळं घबाड सापडलं. एवढंच नाही तर जतीन हुक्केरी हा रान्याचा पती आहे. तो प्रतिथयश आर्किटेक्ट आहे. त्याचं किंवा त्याच्याशी संबंधित कुणाचंही काम दुबईत सुरु नाही अशीही माहिती पोलिसांना मिळाली ज्यामुळे रान्या दुबईत तस्करीसाठी जात असावी असा संशय पोलिसांना आला. ज्यानंतर तिची झडती घेण्यात आली. त्यात तिच्याकडे १२ कोटींहून अधिक रकमेचं सोनं मिळालं. या प्रकरणी रान्या रावला अटक झाली. न्यायालयात गेल्यावर तिने रडायलाच सुरुवात केली.