आंध्र प्रदेशमध्ये २९ ऑक्टोबर २०२३ रोजी दोन पॅसेंजर ट्रेनची धडक झाली होती, या अपघातामध्ये १४ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. पॅसेंजर ट्रेनचा चालक आणि सहचालक हे अपघात होण्यापूर्वी मोबाईलवर क्रिकेट सामना पाहत असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी अपघातासंदर्भात माहिती देताना हा धक्कादायक खुलासा केला. आंध्र प्रदेशच्या विजयनगरम जिल्ह्यातील कंटकपल्ली येथे हावडा-चेन्नई रेल्वे लाईनवर रायगड पॅसेंजर ट्रेनने विशाखापट्टनम पलासा ट्रेनला मागून धडक दिली होती. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला, ज्यामध्ये ५० हून अधिक प्रवाशी जखमी झाले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

३४ केंद्रीय मंत्री रिंगणात, भाजपची पहिली यादी जाहीर; पंतप्रधान मोदी वाराणसीतून, मीनाक्षी लेखी यांच्यासह तीन मंत्र्यांना वगळले

भारतीय रेल्वे आता नवीन सुरक्षा उपायांवर काम करत आहे. त्याबद्दल माहिती देत असताना मंत्री वैष्णव यांनी आंध्रप्रदेशमध्ये मागच्यावर्षी घडलेल्या अपघाताचा उल्लेख केला. ते म्हणाले, “आंध्र प्रदेशमध्ये जो अपघात घडला त्याच्यामागे कारण असे की, लोको पायलट आणि सह-पायलट दोघेही मोबाईलवर क्रिकेटचा सामना पाहत होते, म्हणून त्यांचे लक्ष विचलित झाले. आता रेल्वेमध्ये आम्ही अशी प्रणाली बसवत आहोत, ज्यामुळे अशा चुकांचा आम्ही शोध घेऊ शकू. पायलट आणि सह-पायलट दोघेही फक्त रेल्वे चालविण्यावरच लक्ष केंद्रीत करतील, यावर यापुढच्या काळात अधिक भर दिला जाणार आहे.

वैष्णव पुढे म्हणाले की, आम्ही सुरक्षेवर अधिक भर देत आहोत. प्रत्येक अपघातानंतर आम्ही खोलात जाऊन त्याची चौकशी करत आहोत. अपघाताचे कारण शोधल्यानंतर पुढच्यावेळेस या कारणामुळे अपघात होऊ नये, म्हणून त्यावर उपाय शोधण्याचा आमचा प्रयत्न आहे.

आण्विक शस्त्रांचं साहित्य पाकिस्तानला नेणाऱ्या चीनी जहाजाला मुंबईत अडवलं, भारताच्या कारवाईनंतर जगभर खळबळ

आंध्रप्रदेशमध्ये अपघात झाल्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (सीआरएस) केलेल्या तपासणीचा अहवाल अद्याप सार्वजनिक केलेला नाही. अपघाताच्या दुसऱ्या दिवशी प्राथमिक तपासात रायगड पॅसेंजर ट्रेनच्या पायलट आणि सह पायलटला अपघातासाठी जबाबदार धरले होते. त्यांनी दोन सिग्नल ओलांडले असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या अपघातामध्ये दोघांचाही मृत्यू झाला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Driver was watching cricket on phone minister on deadly andhra train collision kvg