अवयव प्रत्यारोपणाचे प्रमाण मागच्या काही काळात देशात वाढले आहे. ब्रेन डेड किंवा मृत व्यक्तीचे अवयव दुसऱ्या एखाद्या रुग्णाला प्रत्यारोपित करुन जीवदान दिले जाते. यामध्ये अवयव एका ठिकाणहून दुसऱ्याठिकाणी नेण्याचे मोठे आव्हान असते. ठराविक कालावधीत अवयव संबंधित ठिकाणी पोहोचला तरच तो प्रत्यारोपणासाठी उपयुक्त ठरु शकतो. यासाठी सध्या अनेक ठिकाणी ग्रीन कॉरीडॉरची मदत घेण्यात येते. वेगळ्या राज्यात जायचे असेल तर हा अवयव विमानाने पाठवला जातो. तरीही विमानतळापासून रुग्णालयापर्यंत तो वेळेत पोहोचणे गरजेचे असते. दोन गावांमधील अंतर कमी असेल तर रस्त्यानेही अवयवाचे वहन केले जाते. त्यासाठी सामान्य वाहतुकीसाठी ठराविक रस्ते विशिष्ट कालावधीसाठी बंद करण्यात येतात. मात्र त्यामुळे असंख्य लोकांची गैरसोय होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in