नवी दिल्ली :कोविड १९ विषाणूच्या सर्व प्रकारांवर प्रभावी ठरू शकतील अशा औषधांचे प्रयोग यशस्वी झाले असून उंदरांवर हे प्रयोग करण्यात आले होते. करोनासंबंधित श्वसनरोगांवरही ही औषधे उपयुक्त आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘सायन्स इम्युनॉलॉजी’ या नियतकालिकात हा शोधनिबंध प्रकाशित करण्यात आला असून ‘डीअ‍ॅब्झी’ नावाचे औषध शरीरातील प्रतिकाराचा  प्रतिसाद वाढवत असून विषाणू व जीवाणू यांच्याविरोधात संरक्षण फळीतील सर्वात महत्त्वाच्या पेशींना यातून बळ मिळत असते.

या औषधांच्या एका मात्रेतच करोनाच्या विषाणूचे नियंत्रण करण्यात यश येते. या औषधांच्या मदतीने प्रतिकारशक्ती प्रणालीतील  आघाडीवरच्या फळीतील पेशी काम करू लागतात. दक्षिण आफ्रि केचा बी.१.३५१ व इतर विषाणू प्रकारांवर हे औषध गुणकारी ठरले आहे, असे अमेरिकेतील पेनसिल्वेनिया विद्यापीठातील प्राध्यापक सारा चेरी यांनी म्हटले आहे.

सार्स सीओव्ही विषाणूवर विषाणूरोधक औषधे तयार करण्याची गरज असून आता विषाणूचे अनेक घातक प्रकार पुढे येत असताना विषाणूवर औषधे तयार करणे महत्त्वाचे बनले आहे. करोनाच्या विषाणूने शरीरात प्रवेश केल्यानंतर तो पहिल्यांदा श्वसनमार्गात जातो व तिथे त्याला पहिला प्रतिकार होणे गरजेचे असते. आताच्या संशोधनात विषाणू फुफ्फुसाच्या पेशींवर कशा प्रकारे परिणाम करतो याचा अभ्यास करण्यात आला आहे. प्राथमिक संशोधनानुसार हा विषाणू प्रतिकारशक्ती प्रणालीचा प्रतिसाद टाळण्यासाठी लपून बसतो, असे सूक्ष्मदर्शकातून पाहिले असता दिसून आले.