Lawrence Bishnoi Gang Claim Murder Of Drugs Smuggler Sunil Yadav : आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर सुनील यादव याची लॉरेन्स बिश्नोई गँगने गोळ्या घालून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतली कॅलिफोर्निया येथे दोन दिवसांपूर्वी यादव याची हत्या करण्यात आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने यासंबंधी वृत्त दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्टॉकटोन भागातील ६७०० ब्लॉक येथील घरात घुसून यादव याची हत्या करण्यात आली आहे. दरम्यान सोमवारी अमेरिकास्थित गोल्डी ब्रार आणि रोहित गोदारा यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. ब्रारच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, “सर्व भावांसाठी, मी, रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार, कॅलिफोर्नियामध्ये सुनील यादव उर्फ ​​गोलीच्या हत्येची संपूर्ण जबाबदारी स्वीकारतो. आमचा प्रिय भाऊ अंकित भादू याचे एन्काउंटर घडवून आणण्यासाठी त्याने पंजाब पोलि‍सांशी हा‍तमिळवणी केली. आम्ही त्याच्या मृत्यूचा बदला घेतला”.

हत्येमागील कारण काय?

ब्रार याच्याकडून ज्या घरात यादव याची हत्या करण्यात आली त्या घराचा नंबर (६७०६) देखील देण्यात आला आहे. या पोस्टमध्ये पुढे सुनील यादव हा अंमली पदार्थांच्या व्यापारात गुंतलेला होता, तसेच पंजाब, हरियाणा आणि राजस्थान येथे अंमली पदार्थांचा पुरवठा करणे आणि पोलि‍सांशी संबंध असल्याचा आरोपही या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. तसेच अंकित भादू एन्काउंटर प्रकरणात त्याचा सहभाग उघड झाल्यानंतर तो अमेरिकेत पळून गेल्याचा दावाही या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.

“आमच्या सर्व शत्रूंनी तयार राहावं, तुम्हा जागात कुठेही असाल तरी आम्ही तुमच्यापर्यंत पोहचू”, असा इशाराही या फेसबुक पोस्टमध्ये देण्यात आला आहे. दुबईपासून ते अमेरिकेपर्यंत सुनील यादव हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील अंमली पदार्थ तस्करीमध्ये सहभागी असल्याचे तपासात समोर आले आहे.

हेही वाचा>> Allu Arjun : अल्लू अर्जुन पुन्हा अडचणीत; चेंगराचेंगरीनंतर आता ‘पुष्पा २’मधील ‘या’ सीनवरून वाद, काँग्रेस नेत्याने केली तक्रार

तो मूळचा पंजाबमधील अबोहार, फाजिल्का येथील आहे. दोन वर्षांपूर्वी राहुल नावाने पासपोर्ट मिळवून प्रशासनाला गुंगारा देत अमेरिकेत पळून जाण्यात यशस्वी झाला होता, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. दुबईतील प्रशासनाने काही साथीदारांना अटक केल्यानंतर ताबडतोब राजस्थान पोलिसांनी यादव विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drug smuggler sunil yadav shot dead in california us lawrence bishnoi gang goldy brar godara claim attack rak