राजस्थानमधील उदयपूर येथे एका वर्षीय मद्यधुंद व्यक्तीने ८५ वर्षीय महिलेला बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत महिलेचा मृत्यू झाला आहे. आरोपी स्वत: भगवान शिवाच्या अवतारात असल्याच्या भ्रमात होता. महिलेला मारून तिला पुन्हा जिवंत करू शकतो, असा दावाही मद्यधुंद व्यक्तीने केला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे.
शनिवारी ( ५ जुलै ) सायर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या तारपाल गावात ही घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी प्रताप सिंह ( ७० वर्ष ), नाथू सिंह आणि व्हिडीओचे चित्रीकरण करणाऱ्या दोन अल्पवयीन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे.
हेही वाचा : प्रियकराशी संगनमत करत बापाने लेकीच्या जीवाचा केला सौदा, कारण वाचून बसेल धक्का
मिळालेल्या माहितीनुसार, मद्यधुंद प्रताप सिंहने महिलेला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. तेव्हा महिला आरोपीकडे मारू नको, अशी याचना करत होती. पण, निष्ठूर मद्यधुंद आरोपी महिलेला मारतच राहिला. यात महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ बनवत असलेल्या तरुणांनीही आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण, कोणताही उपयोग झाला नाही.
हेही वाचा : आधी लघवी पाजली मग गुप्तांगात…; दोन अल्पवयीन मुलांबरोबर अमानुष कृत्य, संतापजनक घटनेचा VIDEO व्हायरल
याबाबत उदयपूरचे एसपी भूषण भुवन भूषण यादव म्हणाले, “स्वत:ला शिवाचा अवतार समजून महिलेला मारहाण केली. महिलेला मारून पुन्हा जिवंत करू शकतो, असा दावा आरोपीने तपासात केला आहे. याप्रकरणी चार जणांना अटक केली आहे.” ‘इंडियन एक्स्प्रेस’ने याबाबत वृत्त दिलं आहे.