दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन अर्थात डीटीसीच्या बस कंडक्टरने एका महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीनं पीडित महिलेला देवाचा प्रसाद खायला देत राक्षसी कृत्य केलं आहे. आरोपीने दिलेला प्रसाद खाल्ल्यानंतर पीडितेला गुंगी आली. यानंतर आरोपीनं पीडितेवर बलात्कार केला. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने तक्रारदार महिलेचे अश्लील फोटो आणि व्हिडीओज शूट केले. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी तिमरपूर पोलीस ठाण्यात आरोपी बस कंडक्टरसह त्याच्या एका मित्रावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून अन्य एक आरोपी फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला २०१४ ते २०१७ या कालावधीत डीटीसीमध्ये टायपिस्टची नोकरी करत होत्या. पण त्यांना बाळ झाल्यानंतर त्यांनी नोकरी सोडली.

Woman Raped By Mantrik in Mumbai
Mumbai Crime : महिलेवर बलात्कार करुन दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या मांत्रिकाला अटक, मुंबई पोलिसांची कारवाई
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
27 yearold woman raped by minor
अल्पवयीन मुलाकडून महिलेवर बलात्कार
भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेस नेत्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा; नेमकं प्रकरण काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेस नेत्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा; नेमकं प्रकरण काय?
Kerala Crime
Kerala Horror : धक्कादायक! दलित तरुणीवर ५ वर्षांत ६२ जणांकडून बलात्कार; पोलि‍सांनी आतापर्यंत ४४ जणांच्या आवळल्या मुसक्या
Three arrested in rape molestation cases
बलात्कार, विनयभंगातील तीन आरोपींना अटक
Rape of a woman, lure of marriage, Pune, fraud,
पुणे : विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलत्कार, आरोपीकडून अधिकारी असल्याची बतावणी; ३८ लाखांची फसवणूक
thane fake baba marathi news
काळ्या जादूचा नाश करण्यासाठी बाबा आणणार होता मृतदेह, मृतदेह आणण्यासाठी बाबाने घेतले ८ लाख ८७ हजार रुपये

हेही वाचा- १० वर्षात ५१ जणांनी ९२ वेळा केला बलात्कार; पीडितेचा पतीच निघाला ‘मास्टरमाइंड’, VIDEO पाहून महिलेला बसला धक्का

दरम्यान, एकेदिवशी आरोपी कंडक्टर पीडित महिलेच्या घरी देवाचा प्रसाद घेऊन आला होता. आरोपीनं दिलेला प्रसाद खाल्ल्यानंतर काही सेकंदात पीडितेला गुंगी आली. यावेळी पीडितेच्या बेशुद्धावस्थेचा गैरफायदा घेत आरोपीनं तिच्यावर बलात्कार केला. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडितेचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ शूट केले. त्यानंतर त्याने महिलेला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली.

हेही वाचा- धावत्या बसमध्ये कंडक्टरचा प्रवासी तरुणीबरोबर सेक्स, गैरवर्तनाचा VIDEO व्हायरल

या त्रासाला कंटाळून पीडितेनं ब्लॅकमेलिंगची माहिती आरोपीच्या मित्राला दिली. आरोपीच्या मित्राने संबंधित व्हिडीओ डिलीट करण्याचं आमिष दाखवत त्यानेही पीडितेवर बलात्कार केला. यानंतर पीडित महिलेनं बुधवारी तिमरपूर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Story img Loader