Dubai Crown Prince Welcomes His Fourth Child : दुबईचे क्राऊन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम चौथ्यांदा वडील बनले आहेत. बुधवारी शेख हमदान यांच्या पत्नी शेखा शेख यांनी गोंडस बाळाला जन्म दिला. त्यांनी त्यांच्या चिमुकल्या मुलीचं नाव हिंद ठेवलं आहे. हे नाव शेख हमदानची आई हिंद बिंत मकतूम बिन जुमा यांच्या सन्मानार्थ ठेवण्यात आलं आहे. हीच दुबईच्या शाही परिवाराची परंपरा राहिली आहे.

शेख हमदान यांनी त्यांना कन्यारत्न प्राप्त झाल्यानंतर सोशल मीडियावर यासंदर्भातील माहिती दिली. आपल्या मुलीच्या स्वास्थ्य आणि उज्ज्वल भविष्यासाठी त्याने आशीर्वाद मागितले. त्यांच्या या पोस्टवर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे.

दुबईच्या क्राऊन प्रिन्सला आधी आहेत तीन मुलं

शेख हमदान आणि शेखा शेख यांना आधी तीन मुलं आहेत. २०२१ मध्ये त्यांना जुळी मुलं झाली. शेखा आणि रशिद अशी त्यांची नावे ठेवली. त्यानंतर २०२३ मध्ये त्यांना मुलगा झाला. त्याचं नाव मोहम्मद बिन. आता चौथ्यांदा त्यांना मुलगी झाली असून तिचं नाव हिंद ठेवण्यात आलं आहे. कुटुंबात तिचं अत्यंत जल्लोषात स्वागत करण्यात आलं.

शेख हमदान २००८ पासून दुबईचे क्राउन प्रिन्स म्हणून काम करत आहेत आणि त्यांच्याकडे युएईचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्रीपदाचीही जबाबदारी आहे. दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम आणि शेखा हिंद बिंत मकतूम बिन जुमा अल मकतूम यांच्या पोटी जन्मलेले राजकुमार फज्जा म्हणून ओळखले जातात. २०१९ मध्ये, त्यांनी शेखा शेखा बिंत सईद बिन थानी अल मकतूम यांच्याशी एका संयुक्त विवाह सोहळ्यात लग्न केले. यावेळी त्यांचे भाऊ शेख मकतूम आणि शेख अहमद यांचाही विवाह झाला होता.

दुबईच्या शाही कुटुंबात मुलांची नावे कुटुंबातील जुन्या व्यक्तींच्या नावे ठेवली जातात. शेख हमदान यांनीही याच परंपरेचं पालन केलं. ही परंपरा शाही परिवाराची जुनी संस्कृती आहे.