दुबई पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी महिलांच्या एका ग्रुपवर कारवाई केली आहे. शहरातील एका उंच इमारतीच्या बाल्कनीमध्ये काही महिला नग्नावस्थेमध्ये उभ्या असल्याचा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केल्याचं असोसिएट प्रेसने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

नक्की वाचा >> नवऱ्याने वर्षभरापासून सेक्स न केल्याने महिलेने दाखल केला एफआयआर

Talbid police have arrested the fugitive gangsters from Ahmedabad and left for Ahmedabad.
अहमदाबादमधून फरारी सराईत पाच गुंडांना कराडजवळ अटक, तळबीड पोलिसांची कारवाई
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Ulhasnagar Bangladesh loksatta news
डोंबिवलीत कोळेगावातून बांगलादेशी महिलांना अटक
High Court question Home Department and Director General of Police to take action against illegal loudspeakers at religious places mumbai news
धार्मिकस्थळांवरील २,९४० बेकायदा ध्वनिक्षेपकांवर काय कारवाई केली? उच्च न्यायालयाची गृह विभागासह पोलीस महासंचालकांना विचारणा
enlist traffic police to stop car racing on coast road
सागरी किनारा मार्गावरील भरधाव गाड्यांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांची मदत घेणार
Image of a person crossing the road while looking at their mobile phone or a related graphic
Viral Video : मोबाइल पाहत रस्ता ओलांडणं पडलं महागात, दुचाकीवरून आलेल्या पोलिसाने लगावली कानशिलात अन् तरुण…
Six Bangladeshi infiltrators arrested from Mahad
महाड येथून सहा बांग्लादेशी घुसखोरांना अटक
Google Map News Assam police
Assam Police : आसाम पोलीस छापा मारायला निघाले अन् गुगल मॅपमुळे पोहोचले नागालँडला; पुढे घडलं असं काही की सर्वांनाच बसला धक्का

युनायटेड अरब अमिरातीमध्ये सार्वजनिक ठिकाणी सभ्यता पाळण्यासंदर्भातील नियमांमध्ये नग्नता आणि कायदेबाह्य वर्तन या गुन्ह्यांच्या समावेश आहे. या प्रकरणी कोणी दोषी अढळल्यास सहा महिने तुरुंगवास आणि पाच हजार दिऱ्हाम्स म्हणजेच जवळजवळ एक लाख रुपये दंड शिक्षेची तरतुद आहे. याप्रमाणे पॉर्नोग्राफिक गोष्टी सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून शेअर करणंही युएईमध्ये गुन्हा आहे. देशामध्ये इस्लामिक कायद्यांनुसार शिरिया कायदे लागू करण्यात आले आहेत. अश्लील साहित्याची देवाणघेवाण करणं हा कायद्यानुसार गुन्हा आहे. या प्रकरणी या महिलांना दोन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होण्याची शक्यता मेट्रो या इंग्रजी वेबसाईटने व्यक्त केलीय.

नक्की वाचा >> “मी बोरिस जॉन्सन यांच्यासोबत अनेकदा शरीरसंबंध ठेवलेत, आम्ही एकमेकांना सेक्शुअल फोटोही पाठवायचो”

शनिवारी उशीरा दुबईमध्ये असाच एक अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये एक डझनहून अधिक महिला बाल्कनीमध्ये नग्नावस्थेमध्ये उभ्या असल्याचे दिसत आहे. दुबईतील मरिना येथील एका उंच इमारतीमधील हा व्हिडीओ आहे. दिवसाढवळ्या हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. दुबईमध्ये सार्वजनिक ठिकाणी चुंबन घेणं किंवा परवाना नसताना दारुचं सेवन करणंही गुन्हा असणाऱ्या देशामध्ये असा व्हिडीओ व्हायरल झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. द नॅशनल या सरकारी वृत्तपत्राने हा व्हिडीओ एक पब्लिसिटी स्टंट आहे असं म्हटलं आहे. मात्र याबद्दलची अधिक माहिती वृत्तपत्राने दिलेली नाही.


दुबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणामध्ये कायदेशीर कारवाई सुरु आहे. “अशाप्रकारचं वागणं हे मान्य करण्यासारखं नाही. हे वागणं अमिरातीमधील संस्कृती आणि मुल्यांशी साधर्म्य साधणारं नाहीय,” असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

नक्की वाचा >> संसद भवनात Sex आणि अश्लील चाळे… ऑस्ट्रेलियामध्ये राजकीय भूकंप

इतर मध्य आशियाई देशांपेक्षा दुबई अनेक अर्थांनी नवे विचार स्वीकारणारा प्रदेश म्हणून ओळखला जातो. मात्र येथील कायदे कठोर आहेत. सोशल नेटवर्किंगवर केलेल्या कमेंट आणि व्हिडीओंसाठी अनेकांना अटक करण्यात आल्याची प्रकरणही देशात घडली आहे. येथील कायद्यांमुळेच देशातील अनेक बड्या टेलिकॉम कंपन्यांनी पॉर्नोग्राफीक वेबसाईट बंद केल्यात.

Story img Loader