संयुक्त अरब अमिरातीचे पंतप्रधान बिन राशिद अल मकतूम यांच्या मुलीने सोशल मीडियावर पतीला घटस्फोट दिला आहे. मकतूम यांची मुलगी शेख महरा बिंत यांनी दोन महिन्यांपूर्वीच एका मुलीला जन्म दिला. या गोड बातमीनंतर त्यांनी लगेच घटस्फोटही घेतल्याने त्यांच्या सोशल मीडियाच्या खात्यावर अनेक कॉमेंट्सही आल्या आहेत.
१९९४ मध्ये जन्मलेल्या शेख महारा यांनी गेल्यावर्षी २७ मे रोजी शेख माना बिन मोहम्मद बिन रशीद बिन माना अल मकतूम यांच्याशी लग्न केलं. लग्नानंतर पाच महिन्यांनी त्यांनी गुड न्यूज दिली. सोनोग्राफीचा फोटो स्टोरीवर शेअर करत त्यांनी ही बातमी दिली होती. पण आता त्यांनी घटस्फोटाबाबत पोस्ट केली आहे.
हेही वाचा >> Oman Oil Tanker Sinks : ओमानच्या किनाऱ्यावर तेलवाहू जहाज बुडाले; १३ भारतीयांसह १६ कर्मचारी बेपत्ता
मकतूम यांची मुलगी शेख महरा यांनी त्यांचा पती शेख माना बिन मोहम्मद बिन रशीद बिन माना अल मकतूम यांच्यापासून घटस्फोट घेत असल्याची घोषणा इंस्टाग्रामवर केली. त्यांनी इंस्टाग्राम पोस्टवर म्हटलंय की, “प्रिय पती, तू इतर लोकांमध्ये व्यग्र असल्याने मी घटस्फोट जाहीर करते. मी तुला घटस्फोट देते”, असं त्यांनी डिजिटल घटस्फोट जाहीर केला आहे.
युएईचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन राशिद अल कमतूम यांनी नुकतेच त्यांच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल केले आहेत. त्यांनी त्यांचा मुलगा, अमिरातीचा क्राउन प्रिन्स, युएईचा संरक्षण मंत्री म्हणून नियुक्त केला.
कोण आहेत शेख महरा बिंत?
युएईचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन राशिद अल कमतूम यांनी नुकतेच त्यांच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल केले आहेत. त्यांनी त्यांचा मुलगा, अमिरातीचा क्राउन प्रिन्स, युएईचा संरक्षण मंत्री म्हणून नियुक्त केला.
शेख महरा यांचे वडील शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम हे युएईचे पंतप्रधान आहेत. शेख महराची आई झो ग्रिगोराकोस ग्रीसची असल्याने त्यांना अमिराती आणि ग्रीक या दोन्ही संस्कृतीची जाण आहे. दरम्यान, शेख मेहरा यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला असला तरीही शेख मेहरा यांचे त्यांच्या आईबरोबर चांगले नाते आहे.