यंदाचा प्रजासत्ताक दिन सोहळा परदेशी प्रमुख पाहुण्याविना पार पडणार आहे. करोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जगात चिंताजनक स्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर अन्य देशाच्या किंवा सरकारच्या प्रमुखाला निमंत्रित न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली.

यापूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी निमंत्रण स्वीकारले सुद्धा होते. पण ब्रिटनमध्ये करोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली. त्यांना मायदेशात थांबणे आवश्यक होते. त्यामुळे बोरिस जॉन्सन यांनी त्यांचा भारत दौरा रद्द केला. त्यानंतर प्रजासत्ताक दिन सोहळयासाठी कोणाला निमंत्रित करणार अशी चर्चा सुरु झाली होती. पण आता करोना स्थितीमुळे कुठल्याही परदेशी प्रमुखाला निमंत्रित न करण्याचा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी ब्रिटनमधून १९९३ साली जॉन मेजर हे भारताच्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणारे ब्रिटनचे शेवटचे पंतप्रधान ठरले होते.

Story img Loader