बँकेची जर काही महत्त्वाची कामं असतील तर ती 20 तारखेच्या आधीच करुन घ्या, जर 20 तारखेपर्यंत बँकेची कामं केली नाहीत तर तुम्हाला बरेच दिवस वाट पाहावी लागेल. कारण 20 तारखेनंतर 5 दिवस बँका बंद असणार आहेत. 21 ते 26 डिसेंबरदरम्यान 5 दिवस बँका बंद असतील.
21 डिसेंबर रोजी बँक कर्मचाऱ्यांबाबत केंद्राच्या नीती विरोधात ऑल इंडिया बँक ऑफिसर कन्फडरेशनने (AIBOC) संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. वेतनवाढ आणि बँक ऑफ बडोदा, देना बँक व विजया बँक यांच्या विलयाच्या निर्णयाला विरोध यासाठी बँकांकडून संपाचे हत्यार उपसण्यात आले आहे. त्यामुळे 21 डिसेंबर रोजी संप, 22 आणि 23 डिसेंबर रोजी चौथा शनिवार आणि रविवार असल्याने बँकांना सुट्टी असेल. सोमवारी म्हणजे 24 डिसेंबर रोजी बँका उघडतील पण मोठ्या गर्दीचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. त्यानंतर 25 डिसेंबर रोजी ख्रिसमसनिमित्त सुट्टी आणि 26 डिसेंबर रोजी युनायटेड फोरमने पुन्हा संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
बँका बंद असल्याने एटीएममध्ये देखील गर्दीचा सामना करावा लागू शकतो. बँकांना सुट्टी असली तरी एटीएमध्ये पैसे टाकण्याचं काम सुरु असणार आहे.