काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून संसद आणि बाहेर वाद सुरु आहे. काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आमच्या पक्षाच्या नेत्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. तुमचा कुत्रा तरी देशासाठी मेला का?, असा हल्लाबोल मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपावर केला होता. मल्लिकार्जुन खरगेंच्या विधानावर त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्यप्रदेश भाजपाचे आमदार रामेश्वर शर्मा यांनी मल्लिकार्जुन खरगेंच्या वक्तव्यवारून पटलावर केला आहे. “काँग्रेसला कुत्रे मोजायची सवय लागली आहे. देशभक्तांचा आदर राखण्याची सवय काँग्रेसला नाही. काँग्रेसवाले सोनिया गांधींच्या दरबारातील कुत्रे आहेत. जे स्वत: कुत्रे असतात ते दुसऱ्यांना कुत्र्यासारखे बगत असतात. मल्लिकार्जुन खरगे स्वत: सोनिया गांधींच्या १० जनपथचे कुत्रे बनले आहेत. त्यामुळे दुसऱ्यांना कुत्रं बोलणं चुकीचं आहे,” अशी टीका रामेश्वर शर्मा यांनी केली आहे.

हेही वाचा : “न्यायाधीशांच्या नियुक्तीचा अधिकार सरकारला देणं…”, कपिल सिब्बल यांनी व्यक्त केली चिंता; किरेन रिजिजूंना देखील फटकारलं

मल्लिकार्जुन खरगे काय म्हणाले होते?

‘भारत जोडो यात्रे’त बोलताना मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपावर टीकास्त्र डागलं होतं. “आम्ही ( काँग्रेसने ) देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशाच्या एकात्मतेसाठी बलिदान दिलं आहे. आमच्या पक्षाच्या नेत्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. तुम्ही काय केलं? देशासाठी तुमचा कुत्रा तरी मेला का? कुटुंबातील कोणत्या सदस्याने त्याग केला आहे का?,” असं खरगे म्हणाले होतं.

“पंतप्रधान सिंहासारखे बोलतात पण…”

“भारत-चीन सीमेवरील चिनी घुसखोरी मोदी सरकार रोखू शकत नाही. संसदेत चर्चा करण्यास टाळाटाळ करत आहेत. पंतप्रधान सिंहासारखे बोलतात पण प्रत्यक्षात ते उंदरासारखे काम करतात. आम्ही देशाबरोबर आहोत. मात्र, सरकार माहिती लपवत आहे,” असा आरोप मल्लिकार्जुन खरगेंनी केंद्र सरकारवर केला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Durbari kutte of sonia gandhi say bjp mla rameshwar sharma over mallikajun kharge dog remark ssa