प्रेषित मोहम्मद यांच्यावर अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल भाजपाने रविवारी राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना निलंबित केले आणि दिल्लीच्या प्रवक्त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. इराण, कतार आणि कुवेत या तीन प्रमुख आखाती देशांनी भारतीय राजदूतांना बोलावून विरोध केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचा विरोध होत असताना नेदरलँडचे खासदार गीर्ट वाइल्डर्स यांनी उघडपणे त्यांचे समर्थन केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय नेत्या नुपूर शर्मा यांनी पैगंबराबद्दल सत्य सांगितल्याने अरब आणि इस्लामिक देश संतापले हे अतिशय हास्यास्पद आहे, असे गर्ट वाइल्डर्स यांनी म्हटले आहे. “तुष्टीकरणाचे राजकारण कधीही कामाला येत नाही. यामुळे गोष्टी आणखी खराब होतात. म्हणूनच भारतातील माझ्या प्रिय मित्रांनो, इस्लामिक देशांना घाबरू नका. स्वातंत्र्यासाठी उभे राहा आणि प्रेषितांबद्दल सत्य बोलणाऱ्या तुमच्या नेत्या नुपूर शर्मांचा अभिमान बाळगा, असे गीर्ट यांनी म्हटले आहे.

नुपूर शर्मा यांना जीवे मारण्याची धमकी; दिल्ली पोलिसांनी उचललं मोठं पाऊल

आणखी एका ट्विटमध्ये, “हे हास्यास्पद आहे की अरब आणि इस्लामिक देश भारतीय राजकारणी नुपूर शर्मा यांच्यावर प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल सत्य बोलल्याबद्दल संतापले आहेत. भारताने माफी का मागवी?,” असे म्हटले आहे.

विश्लेषण : नुपूर शर्मा वाद अन् आखाती देश… भारतासाठी हे देश एवढे ‘मौल्यवान’ का?

या ट्विटनंतर गिर्ट वाइल्डर्स यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. मला पाकिस्तानपासून तुर्कस्तानपर्यंत धमक्या दिल्या जात आहेत, मात्र या धमकीने काहीही साध्य होणार नाही. मी खरे बोलणे थांबवणार नाही, असे गिर्ट यांनी म्हटले आहे.

विश्लेषण : नुपूर शर्मांचे निलंबन भाजपाच्या घटनेतील कुठल्या नियमाच्या आधारे झाले?

दरम्यान, सौदी अरेबिया, बहरिन आणि अफगाणिस्तानतर्फे सोमवारी भाजपा पदाधिकाऱ्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध केला गेला. सर्व धार्मिक श्रद्धांचा आदर करण्यावर या देशांनी भर दिला. सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून भाजपा प्रवक्त्याच्या वक्तव्याचा निषेध करत म्हटले आहे की, त्यांनी प्रेषित मोहम्मद यांचा अपमान केला आहे. सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, सर्व धार्मिक व्यक्ती आणि पवित्र चिन्हांविरुद्ध पूर्वग्रह वाढवणारी उक्ती-कृती नसावी. पक्ष प्रवक्त्यांना निलंबित करण्याच्या भाजपाच्या निर्णयाचे स्वागतही केले.

तत्पूर्वी, कतार, इराण आणि कुवेतने प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल या वादग्रस्त वक्तव्यावरून रविवारी भारतीय राजदूतांना बोलावले होते. महत्त्वाच्या आखाती देशांनीही या वक्तव्यांचा निषेध करत तीव्र आक्षेप नोंदवला होता.

पाकिस्तानने सोमवारी सांगितले, की त्यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्याचा निषेध नोंदवण्यासाठी भारतीय उच्चायुक्तालयातील प्रभारींना बोलावले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही रविवारी पैगंबरांविरुद्ध केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dutch mp geert wilders supported nupur sharma in of prophet muhammad row abn