तुम्ही मधुचंद्रासाठी नयनरम्य ठिकाणी गेला आहात आणि त्या ठिकाणी तुमच्याबरोबर अघटीत घडले तर…? होय, एका डच व्यक्तिसोबत असंच काहीस घडलं, जेव्हा तो चार हजार फूट उंचीवर पोहोचला होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तिची बायको त्याचे छायाचित्र काढत असताना तो चार हजार फूटावरून खाली पडला. चमत्कार पाहा, एवढ्या उंचीवरून पडूनदेखील या व्यक्तिच्या केसालाही धक्का लागला नाही. ‘देव तारी त्याला कोण मारी!’ ब्रिटीश वृत्तपत्र ‘डेली मेल’मधील वृत्तानुसार या घटनेची माहिती मिळताच मदतकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन या व्यक्तिला सुखरूप वर काढले. एवढ्या उंचीवरून पडून जिवंत राहाणारा तो पहिला माणूस ठरला आहे. सुरुवातीला चाळीस सैनिकांचा सहभाग असलेल्या या मदतकार्यात नंतर सेनेचे हेलिकॉप्टरदेखील बोलवावे लागले. सैनिकांनी दोराच्या साह्याने या व्यक्तिला सुखरूप वर काढले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा