Dwarka Court Judge Aman Pratap Singh : कोणत्याही न्यायालयात शिस्त पाळली जाते, शांतता राखली जाते. सर्वजण न्यायाधीशांच्या आदेशांची पूर्तता करतात. मात्र, न्यायमूर्तीच बेशिस्तपणे वागू लागले तर न्यायालयाच्या प्रतिष्ठेला गालबोट लागणं स्वाभाविक आहे. अशीच एक घटना राजधानी दिल्लीतल्या द्वारका जिल्हा न्यायालयात घडली आहे. या न्यायालयातील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश अमन प्रताप सिंह यांच्या न्यायालयातील बेशिस्त वागण्याचा एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. हे न्यायाधीश न्यायालयात सुनावणी चालू असताना त्यांच्या खुर्चीवरून उठून उभे राहिले होते, तसेच न्यायालयातील कर्मचाऱ्यांवर व वकीलांवर ओरडत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in