जगभरात हवामान बदलविषयक जागरूकतेसाठी ‘अर्थ अवर’ पाळण्यात आला. अगदी एम्पायर स्टेट बिल्डिंगपासून ते आयफेल टॉवपर्यंत जगातील अनेक प्रसिद्ध वास्तूंवरील दिवे मालवले गेले. एरवी रात्री दिमाखात दिव्यांनी उजळणारी एम्पायर स्टेट बिल्डिंग ही एखाद्या ठिपक्याप्रमाणे भासत होती. जगभरातील अनेक लोकांनी काल अर्थ अवरमध्ये भाग घेतला. डब्ल्यू.डब्ल्यू.एफ. या संवर्धन गटाने त्याचे आयोजन केले होते. लासवेगासचा सगळा चमचमणारा पट्टा काही काळ आपला दिमाख हरवून बसला होता. फ्रान्समध्ये पॅरिस हॉटेलमध्ये आयफेल टॉवरची प्रतिकृती आहे. तेथील दिवे मालवण्यात आले होते. अनेक कॅसिनो व हॉटेल्समधील दिवे तासाभरासाठी विझवण्यात आले. अमेरिकेत पश्चिम किनाऱ्यावरील सॅनफ्रान्सिस्कोचा गोल्डन गेट ब्रीज, पायलॉन्स गेटवे अंधारात हरवले होते. दक्षिणेकडे मेक्सिको सिटी व रियो डि जानिरो येथेही पृथ्वीसाठी एक तास वेगळा काढून दिवे मालवण्यात आले.
फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे डिसेंबरमध्ये जागतिक हवामान परिषद होणार आहे, त्यामुळे यंदाच्या अर्थ अवरला जास्त महत्त्व होते.
बर्लिनमध्ये ब्रँडेनबर्ग गेट येथे मेणबत्त्या लावून सेव्ह अवर क्लायमेट नाऊ असा संदेश देण्यात आला. मॉस्कोत क्रेमलिनची इमारत एरवी हिऱ्यासारखी चमकते, पण ती दिसत नव्हती.
ऑस्ट्रेलियात कृषिक्षेत्र हवामान बदलांमुळे धोक्यात आहे, असे नॅशनल अर्थ अवरच्या व्यवस्थापिका अॅना रोझ यांनी सांगितले. हाँगकाँगमध्ये व्हिक्टोरिया हार्बरचा भाग अंधारात बुडाला होता, त्यात ११८ मजली इंटरनॅशनल कॉमर्स सेंटरचा समावेश होता. तैवानमध्ये तैपेईतील १०१ मजली इमारत, दुबईतील बुर्ज खलिफा, कौलालंपूरमधील पेट्रोनस मनोरे अंधारात बुम्डाले.
संग्रहित लेख, दिनांक 30th Mar 2015 रोजी प्रकाशित
तापमानवाढीवर जागृतीसाठी जगभरात ‘अर्थ अवर’
जगभरात हवामान बदलविषयक जागरूकतेसाठी ‘अर्थ अवर’ पाळण्यात आला. अगदी एम्पायर स्टेट बिल्डिंगपासून ते आयफेल टॉवपर्यंत जगातील अनेक प्रसिद्ध वास्तूंवरील दिवे मालवले गेले.
First published on: 30-03-2015 at 02:27 IST
TOPICSग्लोबल वार्मिंग
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Earth hour climate change campaign