सोलोमन बेटांना बुधवारी ८ रिक्टर स्केल इतक्या क्षमतेच्या भूकंपाचा जबरदस्त धक्का बसल्याने पॅसिफिक तटवर्ती क्षेत्रात त्सुनामी लाटा उसळल्या. त्यामध्ये पाच जण ठार झाल्याचे वृत्त असून डझनभर घरांची पडझड झाली आहे अथवा ती जमीनदोस्त झाली आहेत. या भूकंपामुळे निर्माण झालेल्या एक मीटरहून कमी उंचीच्या लाटा सोलोमन बेटावर धडकत होत्या. इतकेच नव्हे तर वानुआतू आणि न्यब कॅलेडोनिया येथील समुद्राच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाल्याचेही वृत्त आहे. फिजी बेटांवरही धोक्याची सूचना देणारे भोंगे ऐकू येत होते तर सुवामधील रस्त्यावर भीतीचे वातावरण आहे.
सोलोमन बेटाला भूकंपाचा तडाखा
सोलोमन बेटांना बुधवारी ८ रिक्टर स्केल इतक्या क्षमतेच्या भूकंपाचा जबरदस्त धक्का बसल्याने पॅसिफिक तटवर्ती क्षेत्रात त्सुनामी लाटा उसळल्या. त्यामध्ये पाच जण ठार झाल्याचे वृत्त असून डझनभर घरांची पडझड झाली आहे अथवा ती जमीनदोस्त झाली आहेत.
First published on: 07-02-2013 at 04:24 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Earth quck on soloman hill