सोलोमन बेटांना बुधवारी ८ रिक्टर स्केल इतक्या क्षमतेच्या भूकंपाचा जबरदस्त धक्का बसल्याने पॅसिफिक तटवर्ती क्षेत्रात त्सुनामी लाटा उसळल्या. त्यामध्ये पाच जण ठार झाल्याचे वृत्त असून डझनभर घरांची पडझड झाली आहे अथवा ती जमीनदोस्त झाली आहेत. या भूकंपामुळे निर्माण झालेल्या एक मीटरहून कमी उंचीच्या लाटा सोलोमन बेटावर धडकत होत्या. इतकेच नव्हे तर वानुआतू आणि न्यब कॅलेडोनिया येथील समुद्राच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाल्याचेही वृत्त आहे. फिजी बेटांवरही धोक्याची सूचना देणारे भोंगे ऐकू येत होते तर सुवामधील रस्त्यावर भीतीचे वातावरण आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा