टर्कीमध्ये महाप्रलयकारी भूकंपाने जगाला मोठा हादरा बसला आहे. या भूकंपात आतापर्यंत ३३ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या भूकंपाच्या तीन दिवस आधी नेदरलँडमधील एका संशोधकाने महाप्रलयकारी भूकंपाचा अंदाज वर्तवला होता. डच रिसर्चर फ्रँक हूगरबीट्स यांनी आता भारतासह, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या आसपासच्या प्रदेशात भूकंपाचे मोठं धक्के बसतील असा अंदाज वर्तवला आहे.

फ्रँक हूगरबीट्स यांनी टर्कीमध्ये ७.५ मॅग्निट्युड क्षमतेच्या भूकंपाचा अंदाज वर्तवला होता. परंतु त्यांना कोणी फारसं गांभीर्याने घेतलं नाही. तीन दिवसांनी टर्की आणि सीरियात विध्वंसकारी भूकंप आल्यानंतर सर्वांना हूगरबीट्स यांची आठवण झाली. हूगरबीट्स यांनी आज तकशी बोलताना सांगितलं की, ते ग्रहांच्या हालचालींच्या आधारावर भूकंपाची भविष्यवाणी करतात. तसेच ते सोलार सिस्टिम ज्योमेट्री सर्वेसाठी (SSGEOS) काम करत आहेत. SSGEOS ही एक संशोधन संस्था आहे जी भूकंपाबद्दलची माहिती घेण्यासाठी खगोलीय वस्तूंचे निरीक्षण करते.

possibility of cloudy weather in maharashtra due to low pressure area formed in bay of bengal
रविवारपासून पुन्हा ढगाळ वातावरण; जाणून घ्या, थंडीची लाट, कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Crime NEws
कुवैतहून थेट मध्य प्रदेश गाठलं अन् मुलीवर लैंगिक शोषण करणाऱ्याचा घेतला जीव; मृत्यूचं गुढ उकलायला वडिलांनीच केली मदत!
Home buyers cheated in Kalyan Dombivli
कल्याण, डोंबिवलीत घर खरेदीदारांची फसवणूक
pakistan google search indian movie 1
भारतीय चित्रपट व वेब सीरिजचं पाकिस्तानला वेड; बॉलीवूडचे ‘हे’ सिनेमे सीमेपल्याड ठरले सुपरहिट, पाहा यादी
drought-prone villages Pune, works in drought-prone villages pune, drought-prone villages fund,
पुणे : दरडप्रवण गावातील कामांना गती, २०० कोटींचा निधी मंजूर
Satara , development work Satara, code of conduct Satara, Satara latest news,
आचारसंहिता संपल्याने साताऱ्यात दीडशे कोटींच्या विकासकामांना प्रारंभ
house damaged by falling tree branch in goregaon
गोरेगावमधील झाडाची फांदी पडून घराचे नुकसान

फ्रँक म्हणाले की, मी टर्कीतल्या भूकंपाचा अंदाज वर्तवू शकलो कारण मी त्यावर बरंच संशोधन केलं आहे. भूकंपासंबंधी गोष्टी घडतील असा अंदाज वर्तवला होता. परंतु तीन दिवसांनी भूकंप येईल हे मला माहिती नव्हतं.

हे ही वाचा >> कंगाल पाकिस्तानमधील व्यक्तीचं दिलदार मन, गुप्तपणे भूकंपग्रस्तांना दान केले २४८ कोटी

२००१ सारखा भूकंप येण्याची शक्यता?

आता फ्रँक यांनी अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारतासह हिंद महासागरात मोठ्या भूकंपाची भविष्यवाणी केली आहे. फ्रँक म्हणाले की, या भूकंपाबद्दल थोडा संभ्रम आहे. कारण अजून एक गोष्ट स्पष्ट झालेली नाही की, भूकंप अफगाणिस्तानपासून सुरू होऊन हिंदी महासागरापर्यंत जाईल. २००१ प्रमाणे भारतावर या भूकंपाचा परिणाम होईल होईल असं वाटतंय, परंतु त्याबद्दल ठोस माहिती नाही.

Story img Loader