जगाला हादरवलेल्या नेपाळमधील भूकंपात मृतांचा आकडा दहा हजारवर जाण्याची भीती पंतप्रधान सुशील कोईराला यांनी व्यक्त केली आहे. आतापर्यंत ५०५७ जणांचे मृतदेह सापडले असून ढिगारे उपसण्याचे काम अजून सुरूच असल्याने मृतांची संख्या वाढतच जाणार आहे. दहा हजार लोक जखमीही झाले असून अनेकांवर उपचार सुरू आहेत. तब्बल ८० लाख लोकांचे जगणे भूकंपाने ढासळल्याचे संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केले असून जगभरातून मदतीचा ओघ नेपाळकडे वळत आहे. नेपाळमधील एकूण ६० जिल्ह्य़ांना भूकंपाचा फटका बसला असून सिंधुपाल चौक, काठमांडू, नुवाकोट, धाडिंग, भक्तपूर, गोरखा, कावरे, ललितपूर व रासुवा या जिल्ह्य़ांत सर्वाधिक हानी ओढवली आहे.  
नेपाळमध्ये मोठय़ा प्रमाणात आंतरराष्ट्रीय मदत येत असून भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन मैत्री’च्या माध्यमातून भरीव मदत पाठवण्यात आली आहे. भारतीय लष्करी पथके भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या गोरखा जिल्ह्य़ापर्यंत पोहोचली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्राप्तिकर सवलत दोन दिवसांत
नेपाळमधील भूकंपग्रस्तांसाठी ज्या संस्थांना आर्थिक मदत पाठवायची आहे त्यांना प्राप्तिकर सूट देण्याबाबतची प्रक्रिया दोन दिवसांत पूर्ण केली जाणार आहे.

रुग्णालयांत उपचाराची भीती :  नेपाळमध्ये रुग्णालयांत जखमींचा ओघ वाढत असला तरी रुग्णालयात दाखल व्हायला अनेकजण घाबरत आहेत. भूकंपात अनेक इमारती ढासळल्याने हे रुग्ण भयग्रस्त असून त्यामुळेच रुग्णालयाऐवजी खुल्या मैदानावरील मदत छावण्यातच उपचारांची सोय करावी,  असा त्यांचा आग्रह आहे.

पर्यटक स्वगृही परतले
* नेपाळमधील भीषण आपत्तीत सापडलेल्या सुमारे तीनशे मराठी पर्यटकांना सुखरूप दिल्लीत आणण्यात हवाई दलास यश आले आहे.
*  मंगळवारी सायंकाळपर्यंत दिल्लीतील महाराष्ट्र सदनात सुमारे ९० मराठी पर्यटकांची व्यवस्था करण्यात आली.
* या भूकंपग्रस्तांना त्यांच्या इच्छित स्थळी रेल्वेनेही मोफत पाठविले जाणार आहे.
* बुधवारी महाराष्ट्रातील २८ जणांचा जथ्था रेल्वेने पुण्यास रेल्वेने रवाना होईल.