जम्मू-काश्मीर, पंजाब, हरयाणा आणि हिमाचल प्रदेशच्या अनेक भागांत शुक्रवारी सकाळी भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ५.४ एवढी नोंदविण्यात आली. या भूकंपामुळे जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
काश्मीरमधील किश्तवारमध्ये या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. सकाळी आठच्या सुमारास दोडा आणि किश्तवार जिल्ह्य़ांस भूकंपाचा झटका जाणवला. त्यानंतर २.७ रिश्टर स्केलचे भूकंपोत्तर झटकेही जाणवल्याचे हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दोडा जिल्ह्य़ातील भादरवा येथे भूकंपाच्या तीव्रतेमुळे लोक मुसळधार पावसाला न जुमानता घाबरून घराबाहेर पडले.
पंजाब, चंदिगढ आणि हरयाणाच्या काही भागांनाही सकाळी ५.४ रिश्टर स्केलचे धक्के जाणवले.
हिमाचल प्रदेशच्या सिमला, चम्बा, लाहौल, स्पिती, कुलू आणि कांग्रा जिल्ह्य़ांमध्ये भूकंपाचे धक्के बसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Story img Loader