आसाममधील सोनितपूर जिल्हा आणि अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्य़ास शुक्रवारी भूकंपाचे सौम्य धक्के बसले. सदर भूकंप रिक्टर स्केलवर ४.८ इतक्या क्षमतेचे होते, असे भूकंप सूचक विभागाकडून सांगण्यात आले.
या भूकंपाचा केंद्रबिंदू पश्चिम कामेंग जिल्ह्य़ाच्या उत्तरेकडे २७.९ अक्षांशावर आणि पूर्वेकडे ९२.५ अंश रेखांशावर होता. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमाराला हे धक्के बसले. भूकंपामुळे लोक घाबरले होते.
मात्र यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी अथवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त हाती आलेले नाही.

Story img Loader