चीनमध्ये भूकंप झाला असून, ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. दक्षिणपूर्व भागात ६.६ रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के जाणवले. भूकंपामुळे अनेक घरांचं नुकसान झालं असून, काही भागातील वीज गायब झाली आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, अनेक ठिकाणी अद्यापही बचावकार्य सुरु आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकेतील भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, सिचुआन प्रांतातील कांगडिंग शहराच्या दक्षिण-पूर्वेस सुमारे ४३ किलोमीटर अंतरावर ६.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. स्थानिकांनी एएफपीशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, भूकंपानंतर चेंगडूमधील इमारतींना हादरे बसले. या ठिकाणी अनेक लोक करोना निर्बंधांमुळे घरात बंदिस्त आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Earthquake in china kangding sichuan province 46 people dead sgy