ग्रीसमध्ये शुक्रवारी ५.७ रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला असून त्याचे धक्के राजधानी अथेन्सपर्यत जाणवले. या भूकंपात प्राणहानी किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. अमेरिकी भूगर्भशास्त्रीय पाहणी कार्यालयात या भूकंपाची नोंद ५.७ रिश्टर इतकी झाली असून भूकंपाचा केंद्र िबदू अथेन्सच्या दक्षिणेला ८० मल अंतरावर व ७० मल खोलीवर होता.
सुनामीचा कुठलाही धोका नसल्याचे सांगण्यात आले. अथेन्सच्या भूगतिकी संस्थेने सांगितले की, स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी ६.४५ वाजता तर ग्रीनिच प्रमाणवेळेनुसार ३.४५ वाजता हा भूकंप झाला. त्याची तीव्रता तेथे ५.७ रिश्टर नोंदली गेली असून त्यानंतर कमी तीव्रतेचे अनेक धक्के बसले. ग्रीस हा देश भूकंपप्रवण असून १९९९ मध्ये ५.९ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाने तेथे १४३ लोक ठार झाले होते.
ग्रीसमध्ये भूकंप
ग्रीसमध्ये शुक्रवारी ५.७ रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला असून त्याचे धक्के राजधानी अथेन्सपर्यत जाणवले. या भूकंपात प्राणहानी किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. अ
First published on: 30-08-2014 at 12:10 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Earthquake in greece