ग्रीसमध्ये शुक्रवारी ५.७ रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला असून त्याचे धक्के राजधानी अथेन्सपर्यत जाणवले. या भूकंपात प्राणहानी किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. अमेरिकी भूगर्भशास्त्रीय पाहणी कार्यालयात या भूकंपाची नोंद ५.७ रिश्टर इतकी झाली असून भूकंपाचा केंद्र िबदू अथेन्सच्या दक्षिणेला ८० मल अंतरावर व ७० मल खोलीवर होता.
सुनामीचा कुठलाही धोका नसल्याचे सांगण्यात आले. अथेन्सच्या भूगतिकी संस्थेने सांगितले की, स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी ६.४५ वाजता तर ग्रीनिच प्रमाणवेळेनुसार ३.४५ वाजता हा भूकंप झाला. त्याची तीव्रता तेथे ५.७ रिश्टर नोंदली गेली असून त्यानंतर कमी तीव्रतेचे अनेक धक्के बसले. ग्रीस हा देश भूकंपप्रवण असून १९९९ मध्ये ५.९ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाने तेथे १४३ लोक ठार झाले होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा